Stock Market : शेअर बाजार ‘डेंजर झोन’मध्ये, तब्बल 28 वर्षांचा घसरणीचा रेकॉर्ड मोडला

Stock Market Entered The Danger Zone : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. याचे कारण म्हणजे फेब्रुवारी हा सलग पाचवा महिना आहे ज्यात शेअर बाजार लाल रंगात व्यवहार करत आहे. (Stock Market ) आत्तापर्यंत निफ्टीत 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर सेन्सेक्स 3.93 टक्क्यांनी घसरत आहे. ऑक्टोबरपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. ज्याकडे बाजारातील तज्ज्ञ ‘डेंजर झोन’ म्हणून पाहत आहेत. जवळपास 28 वर्षांपूर्वी शेअर बाजारातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. निफ्टी सलग 5 महिने घसरला होता.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार?, संजय राऊतांनी सांगितली आतली बातमी
शेअर बाजार सलग 5व्या महिन्यात घसरणीसह व्यवहार करत असल्याचे दिसत आहे. आकड्यांमधून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 31 जानेवारी रोजी शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 77,500.57 अंकांवर बंद झाला होता, तो आता 74,454.41 अंकांवर घसरला आहे. याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्समध्ये आतापर्यंत 3,046.16 अंकांची म्हणजेच 3.93 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे, आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य निर्देशांक निफ्टीबद्दल बोललो तर, फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत त्यात 955.05 म्हणजेच 4.06 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील 24 दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 26.04 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
ऑक्टोबरपासून सतत घसरण
विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. आकडेवारीनुसार, सेन्सेक्स 4,910.72 अंकांनी आणि 5.82 टक्क्यांनी घसरला आहे. तर निफ्टी 1,605.5 म्हणजेच 6.22 पर्यंत घसरला. नोव्हेंबर महिन्याबद्दल बोलायचे झाले तर सेन्सेक्समध्ये 0.52 टक्के म्हणजेच 413.73 अंकांची वाढ झाली. त्याच वेळी, निफ्टीमध्ये 0.31 टक्के म्हणजेच 74.25 अंकांची घसरण दिसून आली आहे. डिसेंबर महिन्यात सेन्सेक्स 1,663.78 अंकांनी किंवा 2.08 टक्क्यांनी घसरला. तर निफ्टीमध्ये 486.3 अंकांची किंवा 2.01 टक्क्यांची घसरण दिसून आली. जानेवारी महिन्यात घसरणीचा कल दिसून आला. सेन्सेक्समध्ये 638.44 अंकांची किंवा 0.82 टक्क्यांची आणि निफ्टीमध्ये 136.4 अंकांची किंवा 0.58 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
बाजार 5 महिने घसरला
विशेष म्हणजे 90च्या दशकात सलग 5 महिने शेअर बाजार कोसळण्याचा क्रम दोनदा पाहायला मिळाला. सर्वात मोठी घसरण सप्टेंबर 1994 ते एप्रिल 1995 या कालावधीत होती, ज्या दरम्यान निर्देशांक 8 महिन्यांत 31.4 टक्क्यांनी घसरला. तसेच पाच महिन्यांची घसरण 1996 मध्ये देखील दिसून आली होती. तेव्हा निफ्टी जुलै ते नोव्हेंबर या काळात 26 टक्क्यांनी घसरला होता. सध्या ऑक्टोबर पासून ते आजपर्यंत निफ्टीत 12 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
5 महिन्यात किती नुकसान झाले?
गेल्या 5 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर गुंतवणूकदारांचे 76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जर आपण आकडेवारीवरून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर, 30 सप्टेंबर रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर बीएसईचे मार्केट कॅप 4,74,35,137.15 कोटी रुपये होते, जे 24 फेब्रुवारी रोजी 3,97,97,305.47 कोटी रुपयांवर खाली आले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांचे आतापर्यंत 76,37,831.68 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.