Stock Market: अमेरिका शेअर बाजारासाठी ठरली खलनायक, 5 मिनिटांत बुडाले तब्बल 5 लाख कोटी

  • Written By: Published:
Stock Market: अमेरिका शेअर बाजारासाठी ठरली खलनायक, 5 मिनिटांत बुडाले तब्बल 5 लाख कोटी

Stock Market Opening Latest Update : सोमवारी (3 फेब्रुवारी) देशांतर्गत शेअर बाजारांसाठी जागतिक बाजारातून अत्यंत कमकुवत संकेत मिळाले आणि मोठ्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. (Stock Market ) सेन्सेक्स 442 अंकांनी घसरून 77,063 वर उघडला. यानंतर निफ्टी 163 अंकांनी घसरून 23,319 वर तर बँक निफ्टी 432 अंकांनी घसरून 49,074 वर उघडला. ट्रंम्प यांच्या घोषणांचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे.

अर्थसंकल्पानंतर सोमवारी शेअर बाजार लाल रंगात उघडले. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. अमेरिकेने चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली, त्यामुळे प्रमुख आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली, ज्याचा परिणाम आज भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 700 अंकांनी घसरून 76,827.95 अंकांवर पोहोचला. त्याच वेळी, NSE निफ्टी 207.90 अंकांनी घसरला आणि 23,274.25 अंकांवर पोहोचला.

निर्मला सीतारामन या खडूस बाईने सामान्य कुवतीच्या ठाकरे गटाचे सामनातून अर्थमंत्र्यांवर आसूड

निफ्टी मिडकॅपने जवळपास 900 अंकांच्या घसरणीसह 52,590 चा स्तर गाठला. निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 300 अंकांनी घसरून 16,675 च्या आसपास व्यवहार करत होता. इंडिया VIX 4% पेक्षा जास्त होता. कंझ्युमर ड्युरेबल आणि आरोग्य क्षेत्राची वाढ वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरत होते. सर्वात मोठी घसरण मेटल इंडेक्स आणि ऑइल अँड गॅस इंडेक्समध्ये झाली. निफ्टी मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉम निर्देशांकही घसरला आहे.

निफ्टीवर हिंदाल्को, बीईएल, एलटी, टाटा स्टील, टाटा मोटर्समध्ये मोठी घसरण झाली. तर मारुती, सन फार्मा, टायटन, आयशर मोटर्स, नेस्ले इंडिया हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजारात मोठी भीती आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीही 200 अंकांनी घसरला होता. निक्केई देखील 900 अंकांनी घसरला. चलन बाजारात रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती.

जागतिक संकेत कसे आहेत?

आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत खूपच कमकुवत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. तर टॅरिफ वॉरमुळे अमेरिकन फ्युचर्सवरही प्रचंड दबाव आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली. शुक्रवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 337 अंकांनी घसरला आणि 44,544.66 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite 54 अंकांनी घसरून 19,627.44 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 31 अंकांनी घसरला आणि 6,040.53 च्या पातळीवर बंद झाला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube