डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा ‘राजा’, जिंकली जागतिक स्पर्धा

D. Gukesh : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारतीय बुद्धिबळ खेळाडू डी. गुकेशने जागतिक अजिंक्य स्पर्धा जिंकली आहे.

  • Written By: Published:
D. Gukesh

D. Gukesh : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारतीय बुद्धिबळ खेळाडू डी. गुकेशने (D. Gukesh) जागतिक अजिंक्य स्पर्धा जिंकली आहे. त्याने अंतिम सामन्यात जगजेत्या चीनचा डिंग लिनेरचा (Ding Liner) पराभव केला आहे. विश्वनाथ आनंद (Vishwanath Anand) यांच्यानंतर 18 वर्षीय गुकेश दुसरा भारतीय विश्वविजेता ठरला आहे.  2012 मध्ये विश्वनाथन आनंद यांनी ही स्पर्धा जिंकली होती.

या विजयानंतर गुकेश 18 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे. त्याने 14 राउंडच्या या सामन्यात चिनी डिंग लिरेनचा पराभव केला. सिंगापूर येथे झालेल्या या सामन्यात विद्यमान चॅम्पियन डिंग लिरेनने 14 व्या राउंडमध्ये चूक केली आणि याचा फायदा घेत डी. गुकेशने इतिहास रचला.

सिंगापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनचा डिंग आणि भारताचा गुकेश यांच्यात चुरशीची लढत होती. डिंगने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. तर गुकेशने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये चॅलेंजर म्हणून या चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश केला होता. विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

… तेव्हा अटलजी काय म्हणतील या भीतीने मी खूप घाबरलो, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा

यापूर्वी खेळल्या गेलेल्या 13 फेऱ्यांमध्ये दोघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले होते तर उर्वरित 9 सामने अनिर्णित राहिले होते. त्यामुळे शेवटच्या राउंडपूर्वी दोघांचे समान 6.5 गुण होते. मात्र शेवटच्या राउंडमध्ये भारतीय स्टार खेळाडू डी. गुकेशने शानदार खेळ दाखवत चिनी ग्रँडमास्टरचा पराभव केला आणि 7.5 – 6.5 अशा फरकाने विजेतेपद पटकावले.

follow us