भारताने रचला इतिहास, Chess Olympiad 2024 मध्ये जिंकले सुवर्णपदक

  • Written By: Published:
भारताने रचला इतिहास, Chess Olympiad 2024 मध्ये जिंकले सुवर्णपदक

Chess Olympiad 2024 : ग्रँडमास्टर डी गुकेश (D Gukesh) आणि अर्जुन एरिगेसी (Arjun Erigaisi) यांनी 11व्या राऊंडमध्ये आपापले सामने जिंकून इतिहास रचला आहे. 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad 2024) भारताने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. 97 वर्षांच्या इतिहासात भारताने प्रथमच खुल्या विभागात सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय खेळाडूंनी अमेरिकेचा 2.5-1.5 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

ग्रँडमास्टर आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजर गुकेशने व्लादिमीर फेडोसेव्हचा पराभव केला तर एरिगेसीने जान सुबेल्जचा पराभव केला. 2022 मध्ये भारतीय पुरुष संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

यापूर्वी डी गुकेशने अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करून भारतीय संघाला खुल्या गटात सुवर्णपदक विजेते होण्याच्या अगदी जवळ आणले होते. या वर्षी नोव्हेंबरमध्ये सिंगापूरमध्ये पुढील वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच खेळण्यासाठी सज्ज असलेल्या गुकेशने अव्वल सीडेड संघांविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. गुकेशचा हा विजय खूप खास होता कारण यासह वेस्ली सोनाने आर प्रज्ञानंदाचा पराभव करून अमेरिकेला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली.

या सामन्यात अमेरिकेची आघाडी असूनही, भारतीय संघ हा सामना गमावण्याच्या स्थितीत नव्हता कारण अर्जुन अरिगासीने लॅनियर डोमिंग्वेझ पेरेझवर घट्ट पकड ठेवली होती. अर्जुन जवळपास पाच तास चाललेल्या मॅरेथॉन लढतीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, तर विदित गुजरातीला लेव्हॉन अरोनियनला बरोबरीत रोखण्यात यश आले. खुल्या गटात भारत 19 गुणांसह गुणतालिकेत अव्वल असून चीनपेक्षा दोन गुणांनी आघाडीवर आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या