… तेव्हा अटलजी काय म्हणतील या भीतीने मी खूप घाबरलो, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा
CM Devendra Fadnavis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि भाजपसह (BJP) शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खात्यात किती मंत्रीपदे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल एक किस्सा शेअर केला आहे. टाइम्स नेटवर्कच्या इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मॉडेलिंग केल्याने मला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी बोलवून घेतलं होतं. मॉडेलिंगमुळे अटलजी काय बोलणार याचा विचार करून मी खूप घाबरलो होतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी गंमतीने मॉडेलिंग केले. मी आमदार होतो आणि त्यावेळी मतमोजणीला वेळ लागत होता. त्यामुळे मॉडेलिंगचे काम करणारा माझा फोटोग्राफर मित्र म्हणाला की तुमचे काही फोटो काढायचे आहेत. मलाही वेळ मिळाला म्हणून फोटो काढले. तीन-चार दिवसांनी तो म्हणाला की मी हे सगळे फोटो मॉडेलिंगसाठी वापरणार आहे. हे सर्व मी एका ब्रँडसाठी केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे एक आमदार मॉडेलिंग करत असल्याने ती राष्ट्रीय बातमी बनली. अटलजींनी ती बातमी पाहिली. तेव्हा अप्पा घट्टे अटलजींचे मित्र होते.
दिल्लीतही लाडकी बहीण योजना, दरमहा खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे, केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक
अटलजीने अप्पाजींना सांगितले की, यांना फोन करा आणि बोलवून घ्या. जेव्हा अप्पाजींनी मला फोन केला तेव्हा अटलजी काय म्हणतील या भीतीने मी खूप घाबरलो. मला वाटले होते की मी मुर्खपणा करतोय म्हणून अटलजी माझ्यावर नाराज होणार पण तसं काही झालं नाही. मी तिथे गेल्यावर अटलजींनी मला खूप प्रेम दिले. असं या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ताहिर राज भसीन यांची ‘ये काली काली आंखें’ च्या सीझन 3 वर प्रतिक्रिया, म्हणाला …