2030 मध्ये महाराष्ट्रातील 52 टक्के वीज ग्रीन एनर्जी असणार, देवेंद्र फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) पहिल्या दिवसापासूनच कामाला लागले आहे. पुढील पाच वर्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
या मुलाखतीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिला आहे. याचा मला आनंद आहे, त्याचबरोबर यंदा जनतेने दिलेल्या जबाबदारीची जाणीव देखील आम्हाला आहे. असं देवेंद्र फडणवीस या मुलाखतीमध्ये म्हणाले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आता थांबणार नाही. अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचं सरकार आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले आणि मी आणि अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाले होते. आम्ही तिघांनी अतिशय वेगाने महाराष्ट्राला ट्रॅकवर आणलं. मी मुख्यमंत्री असताना जे प्रोजेक्ट सुरू केले होते त्यांना गती दिली. त्यापैकी काही प्रोजेक्ट सुरू झाले तर काही अंतिम टप्प्यात आहे. तर अनेक नव्या योजना आम्ही सुरु केल्या. तर आता या सर्व योजना आणि प्रोजेक्ट वेगाने पुढे नेण्यासाठी जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिला आहे. असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच येणाऱ्या काळात अनेक गोष्टी करायचे आहे आणि योजनाही सुरु ठेव्याचे आहे पण माझा भर नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे. मी आता चार नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रला कायम दुष्काळमुक्त करू शकतात. त्यामुळे माझा नदीजोड प्रकल्पावर आणि ग्रीन एनर्जीवर भर राहणार आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पहिल्याच दिवशी भारत बॅकफूटवर…, ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाची पकड
मागच्या काळात आम्ही सरकारने 54 हजार मेगावॅटचे प्रकल्प हातात घेतले आहे आणि प्रकल्पांनमुळे 2023 मध्ये महाराष्ट्रातील 52 टक्के वीज ग्रीन एनर्जी (Green Energy) असणार आहे. याचा शेती आणि उद्योग क्षेत्राला सर्वात मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम विरोधात आंदोलन, नगर शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु