आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करुन जागेसंदर्भात मोठं विधान केलं आहे. लोकसभेच्या जागांबाबत राष्ट्रवादीचे अजित पवार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून आलं.
‘गंदी बात’ फेम अभिनेता Aditya Singh Rajput याचा मृत्यू, बाथरुमध्ये आढळला मृतदेह
लोकसभेच्या जागावाटपाचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते घेणार असल्याचं विधान शरद पवारांनी केलं आहे. तसेच सिल्वर ओकवर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपाबाबत अजिबातच चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
काय सांगता! नवरदेव भरमंडपातून पळाला, नवरीचाही 20 किलोमीटर पाठलाग…
दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये जागावाटपांबाबत नेत्यांकडून जे दावे केले जात आहेत त्यामध्ये काही एक तथ्य नसून आमच्यात जागावाटपाबाबत अशी कोणतीही चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रत्येक पक्षाचे दोन प्रतिनिधींनी एकत्र येत चर्चा करुन ठरवाव्यात, अशा सूचना असल्याचं बोलणं झालं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Wrestlers Protest : ‘नार्को टेस्ट करायला तयार पण…,’ बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटुंना घातली अट
तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, आणि उद्धव ठाकरे तिघेही राज्यात एकविचाराने काम करीत असून यापुढील काळातही ते एकविचारानेच काम करणार असल्याचं शरद पवारांनी ठामपणे सांगितलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=Qn8eGBZNqoY
एकीकडे शरद पवारांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या वज्रमुठीबद्दल ठामपणे सांगितलं तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक नेत्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच मुंबई महापालिका स्वबळावर लढवू तर काही आघाडीत, असे मत नाना पटोलेंनी व्यक्त केले. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं असून मुंबई महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. एकत्र काम करणं ही आमची जबाबदारी असून आम्ही एकत्रच काम करणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.