काय सांगता! नवरदेव भरमंडपातून पळाला, नवरीचाही 20 किलोमीटर पाठलाग…
Bride-groom high voltage drama : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)बरेलीत (Bareilly)एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी एका लग्नात आगळीवेगळी घटना घडली आहे. या ठिकाणी नवरदेवानं भर लग्नमंडपातूनच(marriage hall) पळ काढल्याचं समोर आलं आहे. बरं नवरदेवाचं लग्नही त्याच्या प्रेयसीसोबतच लागणार होतं, मग नेमकं असं काय झालं की? नवरदेव भर लग्न मंडपातूनच पळून गेला. काही वेळ नेमकं काय झालं? हेच समजलं नाही. त्यानंतर नवरीमुलीला नवरदेवानं लग्नमंडपातून पळ काढल्याची माहिती समजताच तीनं नवरदेवाचा तब्बल 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन त्याला पकडले आहे. नवरीनं नवरदेवाला जेव्हा पकडलं त्यावेळी मात्र रस्त्याच्या मध्येच हाय होल्टेज ड्रामा (high voltage drama)झाल्याचं दिसून आला, नवरीनं नवरदेवाला पकडल्यानंतर सर्वांनी मिळून त्या दोघांचं पुन्हा लग्न लावून दिलं आहे.
मार्क झुकरबर्गला युरोपियन युनियनचा झटका ! युझर्सचा डेटा विकल्याप्रकरणी ठोठावला मोठा दंड
घडलं असं की, हे बरेलीच्या जुन्या शहरातील एका तरुणीचे बदाऊन जिल्ह्यातील बिसौली येथील एका तरुणासोबत अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याची माहिती समताच मुलीच्या कुटुंबीयांनी बदनामी टाळण्यासाठी तिचे लग्न लावून देण्याचे मान्य केले. तरुणीनेही प्रियकराला लग्नासाठी राजी केले. रविवारी बरेलीतील एका मंदिरात मुलीच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाची तयारी करण्यात आली.
लग्नघटीका जवळ आली अन् मुलगी सजली, नवरी झाली. प्रदक्षिणा घेण्यासाठी मंदिरात सजवलेल्या मंडपात नवरीचं आगमन झालं. इकडं अचानक नवरदेवाचं मन भरकटलं. मैत्रिणीला कपडे घालून आईला बोलवायला सांगून तो मंडपातून निघून गेला. बराच वेळ प्रियकर परत न आल्यानंतर नवरी मुलीनं नवरदेवाशी फोनवर संपर्क साधला, त्यावर त्यानं आईला फोन करण्यासाठी बिसौली येथे जात असल्याचं सांगितलं. यानंतर नवरी मुलीनं जवळजवळ 20 किलोमीटर पाठलाग करुन भामोरा येथे बसमध्ये बसलेल्या नवरदेवाला पकडलं.
यावेळी नवरी मुलीला रस्त्यावर पाहून लोक आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी उपस्थित सर्वांच्याच मनात प्रश्न होता की, नक्की प्रकरण आहे तरी काय? त्यानंतर वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपातून पळून गेल्याचे दिसून आले. नवरी मुलीनं नवरदेवाला बसमधून उतरवलं. त्यावेळी नवरदेवानं आपल्या आईला आणण्याचा आग्रह धरला, मग नवरी मुलीनं त्याला जवळ घेऊन लग्न करण्याचा आग्रह धरला. यावरुन नवरी-नवरदेवामध्ये बराच वेळ वाद सुरु होता. रस्त्याच्या मध्यभागी बघ्यांची गर्दी जमली होती. शेवटी नवरदेवानं नवरीच्या हट्टासमोर हार मानत लग्न करण्यास होकार दिला. अन् नवरीसोबत मंदिरात आला. त्यानंतर दोघांनीही भामोरा येथील शिवमंदिरात येऊन मैत्रिणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले.