मार्क झुकरबर्गला युरोपियन युनियनचा झटका ! युझर्सचा डेटा विकल्याप्रकरणी ठोठावला मोठा दंड

मार्क झुकरबर्गला युरोपियन युनियनचा झटका ! युझर्सचा डेटा विकल्याप्रकरणी ठोठावला मोठा दंड

Mark Zuckerberg Fined for Meta Data Leak : सोशल मीडियावर एखादी पोस्ट लिहून आपण आपले मत व्यक्त करत असतो किंवा लाईक, कमेंटद्वारे दुसऱ्यांच्या पोस्टला सहमती दर्शवतो. एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तर प्रवासातील, हॉटेलमधील व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. पण आपण करत असलेल्या प्रत्येक लाईक, कमेंट आणि पोस्टचा बिझनेस केला जातो. यातून हजारो कोटींची उलाढाल होते हे जर कोणी सांगितले तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. नुकताच युरोपियन युनियनने (European Union) सोशल मीडिया युझर्सचा डेटा विकल्यामुळे दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड केला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या (Wall Street Journal) अहवालानुसार फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लेटफॉर्म्स इंकला (Meta Platforms Inc) युरोपियन युनियनच्या गोपनीयता नियामकांनी $1.3 अब्ज किंवा सुमारे 10 हजार 765 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर देशांतील फेसबुक-इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा अमेरिकेला दिल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड मागील वर्षी Amazon.com इंक वर लावण्यात आलेल्या $821.20 दशलक्ष दंडापेक्षा जास्त आहे.

अतिक अहमदची हत्या अन् लॉरेन्स बिन्शोई गँगचे कनेक्शन उघड; हल्लेखोरांची NIA समोर कबुली

दरम्यान हे संपूर्ण प्रकरण युरोपीय संघातील देशांशी संबंधित आहे. कोणत्याही देशाच्या युजर्सचा डेटा अमेरिकेत पोहोचला तर तो डेटा अमेरिकन गुप्तचर संस्थेपर्यंतही पोहोचू शकतो, अशी भीती नियामकाला आहे. आयर्लंडच्या डेटा संरक्षण आयुक्त हेलन डिक्सन यांच्या नेतृत्वाखाली यूरोपीय संघाचे नियामक, Facebook वापरकर्त्याचा डेटा हस्तांतरित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कायदेशीर साधनावर बंदी घालण्यास अंतिम रूप देत आहेत.

RCBच्या पराभवानंतर नवीन-उल-हकने डिवचले; सोशल मीडियावर भिडले विराटचे चाहते

गेल्या महिन्यात त्यांनी सांगितले की आयरिश डीपीसीकडे Facebook च्या ट्रान्सअटलांटिक डेटा ट्रान्सफरला ब्लॉक करण्यासाठी एक महिना आहे. आता असे बोलले जात आहे की मे अखेरपर्यंत बंदी असू शकते, त्यानंतर फेसबुक यूजर्सचा डेटा ट्रान्सफर करू शकणार नाही.

युरोपच्या सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये पाळत ठेवत युरोप-अमेरिका डेटा ट्रान्सफर करार अवैध असल्याचा निर्णय दिला. मेटाला गेल्या वर्षी डेटा ट्रान्सफर डेटा ट्रान्सफरबाबतही इशारा देण्यात आला होता. त्यानंतर फेसबुकची सेवा युरोपमध्येही बंद करण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज