वामिका-अकाय बाबतच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल विराट-अनुष्काने मानले पापाराझींचे आभार!
Virat Anushka thanks to Paparazzi for Vamika and Akay : सेलिब्रेटी म्हटलं की, त्यांच्या भोवती पापाराझींचा ( Paparazzi ) गराडा हा आलाच मात्र अनेकदा पापराझींकडून देखील सेलिब्रेटींची गोपनियता पाळली जाते. असाच अनुभव भारतीय संघाचा खेळाडू विराट कोहली ( Virat Kohali ) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) हिला आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांची गोपनियता पाळल्यामुळे पापाराझींचे आभार मानले आहेत.
Rohit Saraf: रोहित सराफने ‘इश्क विश्क रिबाउंड’ पोस्टर रिलीज करुन सांगितली चित्रपटाची रिलीज डेट
विराट-अनुष्काला एक मुलगी जिचं नाव वामिका आहे. तर नुकतच त्यांना पुत्ररत्न देखील प्राप्त झालं आहे. अकाय असं त्याचं नाव असून त्याचा जन्म लंडनमध्ये झाला आहे. त्यानंतर अगोदर विराट कोहली आणि त्यानंतर अभिनेत्री अनुष्का आपल्या मुलांना घेऊन भारतात परतली. यावेळी नेहमीप्रमाणे त्यांच्या भोवती पापाराझींचा गराडा जमला होता. मात्र अद्याप देखील विराट अनुष्काच्या मुलाचा फोटो मिडीयासमोर आलेला नाही.
त्यामुळे आपल्या मुलांची गोपनियता पाळल्यामुळे विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने पापाराझींचे आभार मानले आहेत. मीडियाला दिलेल्या मनःपूर्वक नोटमध्ये, जोडप्याने लिहिले, “आमच्या मुलांच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि नेहमी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! विथ लव, अनुष्का आणि विराट”
‘घाटकोपर’ प्रकरणात राजकारणाला उकळ्या; सोमय्या, राणे अन् कदमांनी ठाकरेंना घेरले
विरुष्का लो-प्रोफाइल जीवन जगतात जेणेकरून ते आणि त्यांची मुले सतत मीडियाची नजर टाळू शकतील आणि सामान्य कौटुंबिक जीवन जगू शकतील. त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण केल्याने त्यांच्या कुटुंबावर चांगला परिणाम होऊ शकतो आणि ते त्यांच्या मुलांचे संगोपन कसे करतात याबद्दल ते अत्यंत विचारशील आहेत.