‘घाटकोपर’ प्रकरणात राजकारणाला उकळ्या; सोमय्या, राणे अन् कदमांनी ठाकरेंना घेरले

‘घाटकोपर’ प्रकरणात राजकारणाला उकळ्या; सोमय्या, राणे अन् कदमांनी ठाकरेंना घेरले

Nitesh Rane on Ghatkopar Hoarding Collapse : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने होर्डिंग पडलं अन् या घटनेत १४ निरपराध नागरिकांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येक जण सुन्न झाला आहे. राग अन् चीड सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. दोषींवर कारवाईची मागणीही होत आहे. तर दुसरीकडे राजकारणही सुरू झालं आहे. आज या ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांत शाब्दिक बाचाबाची झाली. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनीही या घटनेवर संताप व्यक्त करत संबंधित दोषी व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे.

Ghatkopar Hoarding Collapse मध्ये 24 वर्षीय तरूणाचा करूण अंत; कुटुंबाने गमावला एकमेव आधार

नितेश राणे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात ते म्हणतात, आता अशी माहिती समोर येत आहे की ही जी होर्डिंग लावणारी कंपनी होती या कंपनीला महापालिकेने आधीच होर्डिंग काढून टाकण्याची नोटीस बजावली होती. परंतु, मालकाने ऐकले नाही. हा मालक नेमका कुणाचा पार्टनर आहे? संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत आणि या मालकाचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेला घेऊन उद्धव ठाकरेंबरोबर फोटो काढला होता का? याचं उत्तर संजय राऊतनं द्यावं. एक पत्र त्यांनी या दुर्घटनेसंदर्भात पोलीस आयुक्तांना लिहावं, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. या दुर्घटनेची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावी अशी मागणीही भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

कुठे फेडणार हे पाप?, राम कदमांचा ठाकरेंना तिखट सवाल

भाजप आमदार राम कदम यांनीही या दुर्घटनेवर संताप व्यक्त करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. कदम यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर उद्धव ठाकरे आणि भावेश भिडे यांच्या भेटीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कदम यांनी लिहीले की, त्या अनधिकृत होर्डिंगला कुणाचे संरक्षण होते हे या चित्रावरून स्पष्ट होते. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारीसाठी १४ लोकांचे नाहक बळी घेता आहेत.. कुठे फेडणार हे पाप..? असा सवाल कदम यांनी विचारला आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत १४ मृत्यू, ७४ जखमींना वाचवले

नियम पायदळी तुडवून तत्कालीन सरकारची परवानगी : सोमय्या

घाटकोपर मध्ये लावण्यात आलेले होर्डिंग बेकायदेशीर होते. येथे फक्त ४० बाय ४० चे होर्डिंग लावण्याची परवानगी होती. प्रत्यक्षात मात्र १२० बाय १२० फूट उंचीच होर्डिंग उभारण्यात आले. नंतर हेच होर्डिंग वारा आणि पावसाच्या तडाख्याने कोसळले. तत्कालीन सरकारने नियमांकडे दुर्लक्ष करत परवानगी दिली. शहरात आजमितीस ४०० पेक्षा जास्त बेकायदेशीर होर्डिंग आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube