ब्रेकिंग : 14 वर्षांचा ‘विराट’ प्रवास थांबला! ‘अँग्री यंग मॅन’ कोहलीचा कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’

Virat Kohli announces retirement from Test Cricket : ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळख असणारा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) अखेर कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मानंदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता विराट कोहलीनेदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत विराटने इन्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. विराटच्या या निर्णयामुळे कसोटी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
Virat Kohli announces retirement from Test Cricket
"It’s been 14 years since I first wore the baggy blue in Test cricket. Honestly, I never imagined the journey this format would take me on. It’s tested me, shaped me, and taught me lessons I’ll carry for life…I’ll always look… pic.twitter.com/4Fs8bmU2HU
— ANI (@ANI) May 12, 2025
कोहलीची पोस्ट नेमकी काय?
निवृत्तीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्टावर विराट एक पोस्ट केली आहे ने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी १४ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू जर्सी घातली होती. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला अशा प्रवासात घेऊन जाईल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला परिभाषित केले आणि मला असे धडे शिकवले जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन. पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे हा माझ्यासाठी खूप खास आणि वैयक्तिक अनुभव आहे. कठोर परिश्रम, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायमचे तुमच्यासोबत राहतात.
View this post on Instagram
मी या फॉरमॅटपासून दूर जातोय ते सोपं नाहीये, पण सध्या ते योग्य वाटत असल्याचे विराटनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मी माझे सर्वस्व दिले आणि मला अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. मी खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आभारी आहे. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन असे म्हणत विराटने #269, साइनिंग ऑफ अशा शब्दांच त्याच्या निवृतीच्या पोस्टचा शेवट केला आहे.
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
विराट कोहलीने जून 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 210 डावांमध्ये विराट कोहलीने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार होता आणि त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपलनंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतके करणारा विराट कोहली एकमेव दुसरा क्रिकेटपटू आहे.