Download App

शरद पवारांनी दीड तास क्लास घेतला अन्…, समरजीत घाटगेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Samarjit Ghatge On Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरातील (Kolhapur) कागलमध्ये (Kagal) समरजीत घाटगे यांनी भाजप

  • Written By: Last Updated:

Samarjit Ghatge On Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरातील (Kolhapur) कागलमध्ये (Kagal) समरजीत घाटगे यांनी भाजपला (BJP) मोठा धक्का देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने कोल्हापुरातील राजकीय समीकरण बदलले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच एका मुलाखतीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला पक्षात घेण्याआधी दीड तास माझा क्लास घेतला आणि त्यानंतर प्रवेशाचा निर्णय घेतला असा खुलासा समरजीत घाटगे यांनी केला आहे.

या मुलाखतीमध्ये बोलताना समरजीत घाटगे म्हणाले की, माझी आणि शरद पवार यांची ऑगस्टमध्ये भेट झाली होती. दिल्लीत झालेल्या या भेटीत त्यांनी माझा दीड तास क्लास घेतला आणि मतदारसंघ कसा जिंकणार सांगा असा प्रश्न विचारला. शरद पवार यांना माझ्यापेक्षा जास्त माझ्या मतदारसंघाबाबत माहिती आहे. या भेटीमध्ये त्यांनी 100-150 मत घेणारा उमेदवार देखील निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम करू शकतो याबाबत देखील त्यांनी मला प्रश्न विचारले असं समरजीत घाटगे यांनी या मुलाखतीमध्ये बोलताना खुलासा केला.

तसेच पक्ष प्रवेशासाठी त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता असं देखील या मुलाखतीमध्ये समरजीत घाटगे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना माझी परिस्थिती माहिती होती, मी भाजप का सोडत आहे हे देखील त्यांना माहिती होते असेही समरजीत घाटगे म्हणाले.

शरद पवार साहेब आपसे बैर नही लेकीन समरजीत तेरी खैर नहीं अशी टीका हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर केली होती. यावर देखील या मुलाखतीमध्ये समरजीत घाटगे यांनी भाष्य करत हसन मुश्रीफ यांना उत्तर दिला आहे.

मोठी बातमी! तिरुपती प्रसाद प्रकरण, ‘भेसळयुक्त तुपा’बाबत एसआयटीच्या तपासाला स्थगिती

यावेळी समरजीत घाटगे म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्याकडे विकासावर बोलायला काहीच नाही. ते आता प्रत्येक भाषणात माझ्यावर टीका करत आहे. मात्र माझ्यासाठी हसन मुश्रीफ यांना निवडणुकीत पराभव करणे हे महत्वाचे नाही. त्यामुळे माझ्याकडे मुश्रीफ यांना उत्तर देण्यासाठी वेळ नाही. असं समरजीत घाटगे म्हणाले. तसेच जर हसन मुश्रीफ यांनी काय केला नव्हता तर तुम्ही शरद पवार यांना सोडून का? गेलात असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी हसन मुश्रीफ यांना विचारला.

follow us