मोठी बातमी! तिरुपती प्रसाद प्रकरण, ‘भेसळयुक्त तुपा’बाबत एसआयटीच्या तपासाला स्थगिती
Tirupati Laddu SIT Investigation : आंध्र प्रदेशात तिरुपती मंदिरातील प्रसादात जनावरांची (Tirupati Laddu) चरबी असल्याच्या आरोपानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात दररोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप होत आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार या प्रकरणात ‘भेसळयुक्त तूप’ संदर्भात एसआयटीचा तपास (SIT Investigation) तात्पुरता थांबवण्यात आला आहे. माहितीनुसार, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अखत्यारित असल्याने सध्या या प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे सर्वोच्च पोलीस अधिकारी द्वारका तिरुमला राव (Dwaraka Tirumala Rao) यांनी दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे एसआयटीचा तपास 3 ऑक्टोबरपर्यंत स्थगित राहणार आहे. आंध्र प्रदेश डीजीपी यांनी सांगितले की, तिरुपती लाडूमधील ‘भेसळ’ बाबत विशेष तपास पथक (एसआयटी) तपास तात्पुरता थांबवण्यात आला आहे कारण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत आहे.
तिरुपती लाडू प्रसाद प्रकरणात तपासासाठी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (CM Chandrababu Naidu) यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने आता 3 ऑक्टोबरपर्यंत एसआयटीचा तपास स्थगित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एसआयटीने तिरुमला येथील गिरणीची तपासणी 30 सप्टेंबर रोजी केली होती. या गिरणीमध्ये लाडू बनवण्याआधी लॅबमध्ये तूप साठवले जाते आणि त्याची चाचणी केली जाते.
धक्कादायक, पिकनिकला जाणाऱ्या स्कूल बसला आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू
काही दिवसापूर्वी वाएसआर काँग्रेस (YSR Congress) सरकारच्या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात जनावरांची चरबी वापरण्यात येत होती असा धक्कादायक आरोप मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीनंतर मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी चंद्रबाबू नायडू घोषित करण्याची घोषणा केली होती.