Download App

पवार अन् ठाकरेंच्या मुख्यमंत्री फडणवीसांना भरभरून शुभेच्छा; राजकारणात नव्या समिकरणांची चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Uddhav Thackeray wishes CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. त्यांना राजकीय पातळीवर टोकाचे विरोधक असले तरी आज मात्र, अनेकांच्या प्रेमळ शुभेच्छा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐकेकाळचे जवळचे आणि टोकाचे विरोधक झालेले उद्धव ठाकेर यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Fadnavis) तसंच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; आज ५५ वा वाढदिवस, असा आहे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्य आणि कष्ट पाहून देवेंद्र फडणवीस थकत कसे नाहीत, असा प्रश्न पडत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर देवेंद्र यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तक प्रकाश कार्यक्रमात ठाकरे-पवारांनी हे गौरवोद्गार काढले.

शरद पवार काय म्हणतात?

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. ते आधुनिकतेची कास धरणारे नेते आहेत. देवेंद्र यांनी आपल्या वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यांच्या कामाचा उरक आणि झपाटा पाहून मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तो कार्यकाळ आठवतो. त्यांचे कार्य आणि कष्ट पाहून देवेंद्र फडणवीस थकत कसे नाहीत, असा प्रश्न पडत असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. फडणवीसांच्या कामाची गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत टिकून राहो आणि कालचक्र क्रमाने वृद्धिंगत होवो अशा शब्दांत पवारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. त्यामुळे देवेंद्र यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाल संपला. त्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याची थेट ऑफर दिली होती. त्यानंतर आदित्य आणि फडणवीस यांची भेट झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आजच्या ठाकरेंच्या शुभेच्यांनंतर अनेक अंगांनी चर्चा सुरू झाल्या आहेत.

follow us

संबंधित बातम्या