Shashikant Shinde On Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोराने चर्चा सुरु झाली आहे. याचा मुख्य कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत माहिती होती आणि त्याला विरोध नव्हता असं सुनील तटकरे म्हणत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाबाबत सुरु असणाऱ्या चर्चांवर तटकरे यांनी मौन बाळगल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या मुद्यावरुन सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, आधी कोणी तरी बोलत होतं की, अजित पवर यांनी आमच्याशी कधीच याबाबत चर्चा केली नाही. आता मात्र म्हणत आहेत की, चर्चा झाली होती. अजित पवारांनी विलीनीकरण करण्याबाबत चर्चा केली होती. मुळात आता का? चर्चा करत आहेत कारण आम्ही आता महाविकास आघाडी म्हणून पुढे गेलो आहोत. आता विलीनीकरणबाबत चर्चा नाही कार्यकर्ते उगाच डिस्टर्ब होतात असं माध्यमांशी बोलातना शशिकांत शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा विषय नाही कारण विलीनीकरण चर्चा अजित पवार यांच्यासोबत झाली होती. अजित पवारंना माहिती होतं की, आगामी काळात मित्र पक्षांसोबत भाजप कसं वागणार आहे. तुम्ही सातारा उदाहरण पाहिलं की, कशा प्रकारे भाजपने सत्ता हातात घेतली. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) एकत्रीकरणासाठी आग्रही होते असं देखील माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले.
मुलाखतीत नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
या मुलाखतीमध्ये बोलताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की, दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पोस्ट मॉर्टम करुन आणलं. अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झालं. पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की, दादांची अंतिम इच्छा होती विलीनीकरणाची, विलीनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं. या तारखेला विलीनीकरण होणार होतं, आणखी एक सो कॉल्ड व्हिडिओ, दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे असं तो झालं सलग दोन दिवस त्या मुलाखती सुरु राहिल्या. मी त्या वेळी बोलण्याच्या मानसिकतेत नव्हतो. बोललो असतो तर अश्रूंचा बांध आवरला नसता.
साकळाई उपसा सिंचन योजनेस अखेर मंत्रीमंडळाची मान्यता-
ज्या पद्धतीनं ते सुरु झालं त्याचा अर्थ राजकीय अर्थ लक्षात आला की काही तरी घडतंय. विलीनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ आता दादा गेलेत आणि विलीनीकरण थांबलं तर विलीनीकरण नंतर होईल. आता विलीनीकरणाचा टोटल सिनॅरिओ बदलतो. आता माझा काही त्याला विरोध होता असा भाग नाही. मला त्या गोष्टीची माहिती होती असं या मुलाखतीमध्ये सुनील तटकरे म्हणाले.
