Download App

Sheetal Mhatre यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणारे दोघे गजाआड!

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या मुंबईतील नेत्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोन जणांना मुंबईतील दहिसर पोलिसांनी गजाआड केले आहे. शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) समर्थकांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओप्रकरणी दहिसर पोलिसात तक्रार दिली होती. तसेच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. मानस कुवर (Manas Kuvar) आणि अशोक मिश्रा (Ashok Mishra) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत शितल म्हात्रे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, फेसबुकवरील मातोश्री नावाच्या पेजवर तसेच उद्धव ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारींनी हा व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केला आहे.

Ajit Pawar : चिंचवडला कलाटे अन् काटे यांच्यात एकवाक्यता करायला कमी पडलो!

सोशल मीडियावर माझा आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. परंतु, हा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात येत आहे, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे.

मी सुद्धा कुणाची तरी आई, कुणाची तरी बहिण आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या घरात देखील महिला आहेत. त्यामुळे इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ मोर्फ करून टाकणे हा प्रकार खालच्या पातळीचा आहे. व्हिडीओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी केली आहे.

Tags

follow us