Download App

शिंदे-फडणवीस हे असंवेदनशील आणि वाचाळवीरांचं सरकार; सुप्रिया सुळेंचा घणाघात

  • Written By: Last Updated:

पुणे : काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची पिके मातीमोल केली. कांद्याला पुरेसं अनुदान नाही. कांद्याला भाववाढ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांवर भाष्य करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुण्यातील कात्रज चौकाची पाहणी करतांना खा. सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात अतिशय गंभीर परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. आम्हाला ज्या प्रकारे माहिती मिळत आहेत, आणि ज्या पद्धतीने टेलिविजनवर शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवली जाते, त्यावरुन कळतं की, बळीराजी परिस्थिती ही खूपच चिंताजनक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन न्याय मिळवून देण्याचं काम राज्य सरकारनं करावं. जेव्हा लाल वादळ मुंबईत पोहोचलं, त्याआधीच सरकार त्यांना नाशिकमध्ये थांबवू शकला असता. तेव्हाच त्यांना साडेतीनशे रुपये दिले असते, तर ते मुंबईत आलेच नसते. मुंबईत आल्यावर त्यांना अनुदान देण्यात आलं. नाशिक मधेच असताना 350 रुपय भाव दिला असता, तर कशाला शेकऱ्यांना एवढी पायपीट करावीच लागली नसती. हे ईडीच सरकार अतिशय असंवेदनशील सरकार आहे. ई म्हणजे एकनाथ शिंदे, डी म्हणजे देवेंद्र फडणवीस, या ईडीच्या सरकारला शेतकऱ्यांशी काही कर्तव्य नाही, अशा शब्दात त्यांना सरकारवर टीका केली.

क्रिकेटच्या देवाने सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचं नातं

रोज एक शेतकरी आत्महत्या करतो. म्हणून आम्ही काय रोज मदत करायची का? असा सवाल सरकारमधील आमदार करत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांच्या संपावर टीका केली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरात पैसे ठेवायला जागा नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांची संपत्ती ही हरामाची संपत्ती आहे, असं वक्तव्य गायकवाड यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचाही सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला. शिंदे-फडणवीस हे वाचाळवीरांचा सरकार आहे. त्यांच्याकडून काय चांगली अपेक्षा करणार? ते असंच काहीतरी बोलत राहणार. त्यामुळं मला काही आश्चर्य वाटत नाही. हे सरकार वाचाळवीरांचं सरकार असून समाजातील घटकांविषयी हे सरकार बेजाबदार आहे, या सरकारला लोकांशी काही देणंघेण नाही, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा जो फॉर्म्युला ठरला, त्यावरही त्यांनी भाष्य केलं. बावनुकळे यांनी भाजप 240 जागा लढणार असून शिवसेनेला 50 जागा देण्यात येतील, असं सांगितलं होतं. यावर बोलतांना खा. सुळे म्हणाल्या की, भाजप हेच करत आलं आहे. तुम्ही त्यांचा जागावाटपाचा आजवरचा इतिहास पाहा, त्यांनी सोबतच्या मित्रपक्षांवर कायम अन्याय केला आहे. भाजपचे देशांमध्ये जेवढे मित्रपक्ष आहेत, त्या सगळ्यांना जागा वाटपाचा हाच अनुभव आहे, असं सुळे यांनी सांगितलं.

 

Tags

follow us