क्रिकेटच्या देवाने सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचं नातं

क्रिकेटच्या देवाने सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचं नातं

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये ‘जाणता राजा’चा (Janata Raja mahanatya) प्रयोग झाला. यावेळी जगप्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) मावळ्याच्या रुपात दिसून आला. ‘जाणता राजा’ महानाट्याच्या सहाव्या दिवशी सचिन तेंडूलकरने हजेरी लावली होती. यावेळी भाजप नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सचिनचे स्वागत केले. व्यासपीठावर सचिन असल्याने चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ‘शाळेत इतिहासाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाली आणि क्रिकेटची सुरुवात शिवाजी पार्कपासून झाली’, असे सचिन यावेळी म्हणाला.

‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगाला हजेरी लावल्यानंतर सचिन म्हणाला, शाळेत इतिहासाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाली आणि क्रिकेटची सुरुवात शिवाजी पार्कपासून झाली. जाणता राजाचा 19 तारखेपर्यंत प्रयोग होणार असल्याचे अशिष शेलार यांनी सांगितले. त्यावेळी मी दिल्लीत होतो. यापूर्वी देखील येण्याची इच्छा होती पण तसा योग आला नव्हता. तो योग आज जळून आल्याने फार आनंद झाला, असे सचिन तेंडूलकर म्हणाला.

IND vs AUS : कांगारूंच्या माऱ्यासमोर टीम इंडियाचा डाव 117 धावांवर आटोपला

आमते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर मुंबईतील शिवतीर्थ येथे जाणता राजा या पौराणकि महाकाव्य नाटकाच्या मंचावर असणे हा एक आनंददायी क्षण होता, असं अशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी पार्क येथे जाणता राजा या महानाट्याचे आयोजन केले आहे. यावेळी महिला व बालविकास कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी यांची उपस्थिती होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube