Download App

IPS Transfer : शिंदे फडणवीसांनी IG, DIG अन् SP बदलले

IPS Transfer : राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक पदावरुन विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजी नगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

यामध्ये विशेषता मुंबई आयुक्तालायचे अपर पोलीस आयुक्त संजय दराडे, ए.डी. कुंभारे, नवी मुंबईचे अपर पोलीस आयुक्त एम. आर. घुर्ये, पिंपरी चिंचवडचे संजय शिंदे, मुंबई अपर पोलीस आयुक्त डी. एस. चव्हाण, डी. आर. सावंत, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त आर. बी. डहाळे, ठाणे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, नांदेड परिक्षेत्र उपमहानिरीक्षक एच. एस. महावरकर, मुंबई पोलीस आयुक्त (वाहतूक) निसार तांबोळी, पुणे उपमहानिरीक्षक जे.डी. सुपेकर यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

ठाणे पोलिस आयुक्त बदली, अप्पर पोलिस महासंचालक बदली
ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंह, मुंबई एटीएसचे अपर पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई अर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंह यांची पदोन्नतीने पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे निखील गुप्ता यांची बदली
तसेच छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई तर पिंपरी चिंचवड सहआयुक्त मनोज लोहिया यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. निखील गुप्ता यांची छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र काढण्यात येणार आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश राज्य सरकारच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षक ते पोलिस उप महानिरीक्षक (अप्पर पोलिस आयुक्त) पदोन्नती
मुंबई पोलीस उपआयुक्त अभिनव डी. देशमुख, मुंबई पोलीस उपआयुक्त अनिल एस. पारसकर, मुंबई पोलीस उपआयुक्त एम. रामकुमार, एसआरपीएफ मुंबई समादेशक शशिकुमार मीना, एसआरपीएफ पुणे समादेशक प्रवीण सी. पाटील

पोलीस उपआयुक्त ते अपर पोलीस आयुक्त
मुंबई पोलीस उपआयुक्त संजय बी. पाटील, एसआरपीएफ पुणे समादेशक वसंत के. परदेशी, पोलीस आधिक्षक बुलढाणा एस.डी. आव्हाड, महाराष्ट्र राज्य एमएसईबी कार्यकारी संचालक पी.पी. शेवाळे, पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे ए. एच. चावरीया यांची अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विरेंद्र मिश्रा यांची मुंबईच्या अपर पोलीस आयुक्तपदी तर पोलीस उपमहानिरीक्षक दिपक साकोरे (राज्य राखीव पोलीस बल, पुणे) यांची नवी मुंबईच्या अपर पोलीस आयुक्तपदी (गुन्हे) बदली करण्यात आली.

Tags

follow us