लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी; शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना ललकारलं

Naresh Mhaske On Uddhav Thackeray : आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीवरुन शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group) प्रवक्ते नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske)उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, ठाकरे आडनावाचा वारसा मिळाला असला तरीही स्वाभिमानाचा वारसा […]

Uddhav Thackeray Naresh Mhaske

Uddhav Thackeray Naresh Mhaske

Naresh Mhaske On Uddhav Thackeray : आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीवरुन शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group) प्रवक्ते नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske)उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, ठाकरे आडनावाचा वारसा मिळाला असला तरीही स्वाभिमानाचा वारसा मात्र उद्धव ठाकरे यांना लाभलेला नाही, त्यामुळेच कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) मुलगा असूनही खाली मान घालून पवारांच्या घरी‌ त्यांची मनधरणी करायला जावं लागलं, अशी घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Karnataka Assembly Election : भाजपनं भाकरी फिरवली; 52 नव्या चेहऱ्यांना संधी

यावेळी नरेश म्हस्के म्हणाले की, आज उद्धव ठाकरे यांची परिस्थिती अशी झाली की, पक्ष गेला, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला, अशी टीका नरेश म्हस्केंनी व्यक्त केली आहे. म्हस्के म्हणाले की, काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली.

पंकजा मुंडे पाथर्डीतून विधानसभा लढणार ? पंकजा काय म्हणाल्या…


आजही काही बैठका होत्या मात्र त्या बैठका देखील रद्द झाल्या. या बैठका नक्की का रद्द झाल्या याची माहिती माध्यमांनी घ्यावी, असंही ते म्हणाले. आमच्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा गायब असल्याने आणि या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवल्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली आहे.

शरद पवार आपली साथ सोडतात की काय? अशी भीती वातल्यानेच काका मला वाचवा असं म्हणत उद्धव ठाकरेनी घाबरून शरद पवार यांची आज त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version