धक्कादायक! संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

हभप मराज यांनी त्यांच्या आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे

धक्कादायक! संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

धक्कादायक! संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

Shirish Maharaj More Commits Suicide : देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. (Maharaj ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दमानियांवर मी उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार; मुंडेंनी खडसावले

शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसंच, त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. २० फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Exit mobile version