Download App

Sanjay Shirsath यांचा अंधारेंना धमकीवजा इशारा… ‘परळीतील धिंड बद्दल बोलू का…?

  • Written By: Last Updated:

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी संभाजीनगर येथील जाहीर सभेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून शिरसाठ यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आंदोलन सुरू केले. त्यामुळे चिडलेल्या संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांना थेट इशारा दिला आहे. परळीमध्ये कोणाची धिंड काढली होती, हे मी बोलू का म्हणून सुनावले आहे. माझ्या विरोधात विनाकारण आंदोलन करू नका. अन्यथा मी सगळंच काढेल, अशी धमकी दिली आहे.

संजय शिरसाठ म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी आपण दुसऱ्याविषयी बोलताना काय बोलतो, कोणाबद्दल बोलतो, त्यातील भाषा काय असते. याचा कधी विचार केला आहे का? त्यामुळे माझ्या विरोधात बोलल्यास मी सुध्दा शांत बसणार नाही. अंधारे यांना त्यांच भाषेत उत्तर देणार आहे.

Sanjay Shirsath अंधारेंची माझ्या बायकोने ओटी भरली… ठाकरे गटात जाण्यापूर्वी त्यांनी मला विचारले… – Letsupp

सुषमा अंधारे यांनी मला जास्त काही बोलायला लावू नये. त्यामुळे आधी तुम्ही जे बोलता ते योग्य आहे का, हे जरा तपासून पहा. मला वरातीतला घोडा, असे बोलता, हे बोलणं तुम्हाला शोभते का, परळीमधून कोणाची धिंड काढणली होती, हे सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा माझ्या नादाला लागू नका. अन्यथा मी तुमचं सर्वच काढेन, असा इशाराच सुषमा अंधारे यांना संजय शिरसाठ यांनी दिला आहे.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us