मुंबई : शिवसेना आमचीच असून इतर कोणत्याही मालमत्तेवर आम्ही दावा करणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विरोधकांकडून संतापाची लाट उसळत असतानाच विधीमंडळाचं कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना भवनावरही दावा करणार का? असा सवाल उपस्थित होत असतानाच आम्ही इतर कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नसल्याचं म्हंटलंय.
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसंतय. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने विधी मंडळाच्या कार्यालयावर दावा करीत कार्यालय ताब्यात घेतलं आहे.
SambhajiRaje Chatrapati : शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मला उद्धव ठाकरेंनी…
याआधीही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई महापालिकेतील कार्यालयावरुन शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर आता या निर्णयानंतरही राडा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांचा फौजफाटा आणि दंगल नियंत्रण दल महापालिकेमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
…तर प्रकाश आंबेडकरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? स्वबळावर लढण्याचा इशारा
आम्हाला कोणत्याही गोष्टीचा मोह नसून आम्ही विधी मंडळानंतर आता इतर कोणत्याही मालमत्तेवर शिवसेना भवनावर दावा करणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
Sambhaji Raje : संभाजीराजे 2024 च्या तयारीला, पदाधिकाऱ्यांची निवड करत रणशिंग फुंकले
मुख्यमंत्र्यांकडून कोश्यारींचं कौतुक :
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या कारकीर्दीमध्ये चांगले काम केलेलं आहे. कोश्यारी यांना विमानातून कोणी उतरवलं हे तुम्हांला माहिती आहे, त्यामुळे आता तो विषय जाऊ द्या.
दरम्यान, एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याबाबतचं पत्र आम्ही लोकसेवा आयोगाला दिलं असून जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे, त्या भूमिकेला राज्य सरकारचा पाठिंबा असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे स्पष्ट केलंय. तसेच अशोक चव्हाण यांच्या तक्रारीबाबत मी चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले असून त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलंय.