Shiv Sena-BJP clash over Mumbai Municipal Corporation seat allocation : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या(BMC Election) अनुषंगाने शिवसेना आणि भाजपमध्ये(Shivsena-BJP) जागा वाटपावरून कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 18 डिसेंबर म्हणजेच गुरुवारी शिवसेना आणि भाजपची महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीत 102 जागांवर भाजपने दावा केला असून शिवसेनेने 109 जागांवर दावा केला असल्याची माहिती आहे.
2017 सालच्या निवडणुकीत जिंकलेल्या 82 जागांवर भाजपने दावा केला असून याच निवडणुकीत ज्या जागांवर भाजपचे उमेदवार 2 नंबरला होते तिथे देखील दावा केला आहे. 2017 सालच्या महापालिका निवडणुकीत जिंकलेल्या 84 जागा शिवसेनेने मागितल्या असून एकूण 109 जागांवर शिवसेना आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या 211 पैकी 150 जागांवर दोन्ही पक्षात संगनमत झालं असून त्यातील 102 जागा भाजपला तर उर्वरित जागा या शिवसेनेला मिळणार असल्याची माहित खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली आहे.
T20 World Cup 2026 साठी आज होणार भारतीय संघाची घोषणा, संजू सॅमसनसह ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी
दरम्यान उरलेल्या 77 जागांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 2017 च्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार करून जागावाटप करण्यास भाजपने साफ नकार दिला असून तेव्हाची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याचं कारण भाजपकडून देण्यात आलं आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
