मुंबई : कसब्यातील प्रचारसभेत अजित पवार यांनी शिवसेना फोडणारे नेते कधीच यशस्वी झाले नाहीत, असा टोला सत्ताधारी पक्षातील नेत्यांना लगावला होता. यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अजित पवारांनी खिल्ली उडवली होती. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर नारायण राणे तर दोनवेळा पडले. एकदा कोकणातून तर दुसऱ्यावेळी वांद्रे मतदारसंघात एका बाईने नारायण राणे यांना पाडले, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर खुद्द नारायण राणेंनेही अजित पवारांवर निशाना साधला होता. दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा आता नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन समाचार घेतला.
आज विधानसभेत आमदार नितेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, चुकीची माहिती महाराष्ट्राला दिली जाते. शिवसेना ज्या ज्या नेत्यांनी सोडली, ते सगळे निवडणुकांत पराभूत झाले आहेत, असं सांगितलं जातं आहे. पण आज महाराष्ट्राला खरी माहिती द्यायची आहे. नारायण राणे यांनी २००५ ला शिवसेना सोडली. ते शिवसेना सोडून गेल्यानंतर जी सोडून पोटनिवडणूक झाली. तेव्हा त्या पोटनिवडणुकीत राणेंनी विरोधी उमेदवाराचं डिपॉजिट चप्त केलं, अशी माहिती नितेश राणेंनी दिली.
यावेळी नितेश राणे यांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या आमदारांची यादीच वाचली. राणेंनी सांगितलं की, कालिदास कोळमकर, शंकर कांबळी, गणपत कदम, सुभाष बने, विजय वडट्टीवर, प्रा. नवले, मानिकराव कोकोटे, भारसाकळे साहेब हे सगळे शिवसेना सोडून गेलेले नेते आहेत. हे जेव्हा शिवसेना सोडून गेले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले होते. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली आणि कॉंग्रेसमध्ये गेले ते सगळे विजयी झालेले होते. याला अपवाद फक्त शाम सावंत हे होते.
केजरीवाल अडचणीत: उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांसह आणखी एका मंत्र्याचा राजीनामा
दरम्यान, सध्या शिवसेनेतून बाहेर पडून जे ४० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. पुढच्या विधानसभा निवडणुकीला हे ४० आमदारही मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असं राणे म्हणाले. आता २ मार्चला कळेल बाई कोणाला पाडते ते असं म्हणत राणेंनी अजित पवारांना टोलाही लगावला.