Shiv Sena Party and Symbol Hearing in Supreme Court : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबात आज सर्वोच्च न्यायालयात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज देखील दुपारी 2 वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे… यामध्ये आतापर्यंत ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. आज देखील सुनावणीची सुरूवात ही सिब्बल यांच्याच युक्तिवादाने होणार आहे. मात्र आज सिब्बल यांचा युक्तिवाद संपणार असल्याचं त्यांनी स्वत: सांगितलं आहे. त्यामुळे सिब्बलांनंतर शिंदेंच्या पक्षाकडून काय युक्तिवाद केला जाणार? ही सुनावणी आज कोणत्या वळणावर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
