Download App

संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे नक्की कोण?, पोलीस यंत्रणा सतर्क होताच सत्य आलं समोर

शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut House Reiki : शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या घराची अज्ञातांनी रेकी केल्याचं म्हटलं गेलं. हा घातपाताचा कट असल्याचा आरोप खुद्द राऊतांनीही केला आहे. (Sanjay Raut) ज्यानंतर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सरतेशेवटी राऊतांच्या घराची रेकी नेमकी कोणी केली होती यामागचं गुपितही उघड झालं आहे.

संजय राऊतांच्या घराची दोन अज्ञातांकडून रेकी, बाईकवरून आलेल्यांकडे 8 ते 10 मोबाईल, तपास सुरू

उपलब्ध माहितीनुसार रेकी करणारे ‘ते’ सेलप्लॅन, इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे चार कर्मचारी होते. ते ईरिक्सन कंपनीकडून Jio मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करत असल्याचं पोलीस चौकशी दरम्यान निष्पन्न झालं. पोलिसांनी तशी संबधीत कंपनीकडून खात्रीसुद्धा केली आहे.

शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी पोलिसांना फोनद्वारे आमदार सुनिल राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास दोन संशयीत इसम मोटार सायकलवर येऊन त्यांच्या घराची रेकी करुन निघून गेल्याचे कळवलं. त्यांच्या या सदर तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली.

follow us