संजय राऊतांच्या घराची दोन अज्ञातांकडून रेकी, बाईकवरून आलेल्यांकडे 8 ते 10 मोबाईल, तपास सुरू…

  • Written By: Published:
संजय राऊतांच्या घराची दोन अज्ञातांकडून रेकी, बाईकवरून आलेल्यांकडे 8 ते 10 मोबाईल, तपास सुरू…

Sanjay Raut House Reiki: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची दोन अज्ञात इसमांनी रेकी केली. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही रेकी करण्यात आला. अज्ञात इसमांनी दहा मोबाईल कॅमेरे लावून ही रेकी केली. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

गौरव खन्ना ते रोहित बोस रॉय पर्यंत, हे चार यजमान आयटीए अवॉर्ड्समधली मजा वाढवणार 

खासदार राऊत हे मुंबईच्या पूर्व उपनगरात असलेल्या भांडुपमध्ये राहतात. राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याची आज (20 डिसेंबर) सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास रेकी करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. या व्हिडिओत खासदार राऊत यांच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरुन आल्याचे दिसत आहे. या व्यक्ती राऊत यांच्या घराच्या मागील बाजूस आल्या होत्या. काही सेंकद ते तिकडे थांबले. त्यांच्याकडे 8 ते 10 मोबाईल होते. त्यांनी राऊतांच्या बंगल्याचे फोटो काढले. त्यानतर ते यूटर्न घेऊन निघून गेले. त्यातील एकाने हेल्मेट घातले होते. चक दुसऱ्याने आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. हे दोघे लोक रेकी करत असताना संजय राऊत यांच्या घरी कोणीच नव्हते.

कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिर असल्याचा दावा अयोग्य; सरसंघचालक भागवतांचं मत 

पोलीसांकडून तपास सुरू…
रेकी करणारी गाडी उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असल्याची शक्यता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस राऊतांच्या घरी पोहोचले आहेत. रेकी करणाऱ्या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. राऊत यांच्या बंगल्याची रेकी करणारे दोघे कोण आहेत? त्यांच्या बंगल्याच्या परिसरात ते का आले आणि त्यांचा हेतू काय होता? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांच्या निवासस्थानाच्या रेकीचा प्रश्न भास्कर जाधव यांनी विधिमंडळात उपस्थित केला.

याआधीही राऊतांच्या घराची रेकी…
संजय राऊत यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाय प्लस सुरक्षा मिळाली होती. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यावर ही सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यानंतर आता राऊतांच्या घराची रेकी करण्यात आली. याबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, यापूर्वी मला धमकीचे फोन आले होते. तसेच रेकी करण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधी रेकी करण्यात आलाी.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube