Download App

प्रकाश आंबेडकरांच्या तोऱ्याला ठाकरेच वैतागले… माजी आमदाराला अकोल्यात तयारीच्या सूचना

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीवरच रोज होणारी टीका, आरोप, शेरेबाजी आणि जागा वाटपबाबत होणारे रोज नवीन दावे या सगळ्याला आता त्यांचा मित्रपक्ष असलेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच वैतागल्याचे दिसून येत आहे. यातूनच जर आंबेडकर आघाडीत येणार नसतील तर अकोल्यात त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) यांनी सुरु केली असल्याची माहिती आहे. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray has started preparing to field a candidate against Prakash Ambedkar in Akola)

आधी आम्ही महाविकास आघाडी नाहीत. आम्हाला दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाने पत्र द्यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर करत होते. त्यानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद आहेत. जागा वाटपावरुन वाद आहेत, आधी त्यांचा वाद मिटू दे मग आम्ही आमची चर्चा करु असे ते म्हणत आहेत. तर कधी आपण 12 जागांची मागणी केली आहे, आमची 48 जागांवर स्वबळाची तयारी आहे, असे विविध दावे सातत्याने आंबेडकर करत आहेत. आंबेडकर यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या या मतांमुळे ते आघाडीत येणार की नाही, याची आघाडीच्याच नेत्यांना शंका आहे.

मोठी बातमी : प्रतिक्षा संपणार, धाकधूक वाढणार; उद्या दुपारी लोकसभेच्या तारखांची घोषणा

यातूनच उद्धव ठाकरे यांनी अकोल्यातील आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही जागा लढविण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. माजी आमदार गजानन दाळू गुरुजी संभाव्य उमेदवार असतील, असे समजते. मात्र ते सहभागी झाल्यास ही जागा त्यांच्यासाठी सोडण्यात येणार आहे आणि ते सहभागी झाले नाहीत, तर अमरावतीच्या बदल्यात काँग्रेस अकोल्याची जागा शिवसेनेसाठी सोडणार असल्याचे समजते. अकोला लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उमेदवार देण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनीही ठाकरेंकडे केली होती.

गजानन दाळू गुरुजींच्या नावाचा विचार :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सध्या माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांच्या नावावर चर्चा सुरु आहे. नुकतेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या या यात्रेतही गजानन दाळू गुरुजी यांना ‘प्रोजेक्ट’ करण्यात आले होते. गजानन दाळू हे बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघातून 1990 साली निवडून आले होते.

follow us