Shiv Sena UBT MP : उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची बातमी होती. या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ठाकरेंचे कोणते खासदार जय महाराष्ट्र करणार असे विचारले जात होते. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे सर्व खासदार राजधानी नवी दिल्लीत एकत्र जमले. आम्ही सगळे एक आहोत. पक्षांतराच्या बातम्या निराधार आहेत. आमची वज्रमूठ आहे. टायगर अभी जिंदा है, अशा शब्दांत खासदार अरविंद सावंत यांनी ठाकरे गटातील एकी अधोरेखित केली. खासदार सावंत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आठ खासदार उपस्थित होते. संजय दिना पाटील कामात व्यस्त असल्याने उपस्थित नाहीत असे सांगण्यात आले. आणखी दोन खासदार गैरहजर होते.
खासदार अरविंद सावंत यांनी सत्ताधारी गटावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचं सरकारमध्ये त्रांगडं सुरू आहे. गंभीर वाद सुरू आहेत. या सगळ्यांवरून दुसरीकडे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार अशा बातम्या सुरू पसरवल्या जात आहेत. मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्यांच्यात संवाद नाही. सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने येऊन सुद्धा रोज नवनवीन बातम्या येत आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. या सगळ्या बातम्या सातत्याने सुरू असताना या बातम्यांवरून लक्ष हटविण्यासाठी कुणीतरी ही मुद्दाम पुडी सोडली आहे.
ठाकरे गटात महाभूकंप! 9 पैकी 6 खासदार करणार जय महाराष्ट्र; धक्कादायक नावांची चर्चा..
काल लोकसभेत शिवसेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला नवीन कार्यालय मिळाले. आम्ही या कार्यालयाचे उद्घाटन केले त्यावेळीही सर्व खासदार उपस्थित होते. आताही सर्व खासदार येथे उपस्थित आहेत. आम्ही मुद्दाम सर्वांना एकत्रित आणलं. आमची वज्रमूठ आहे. टायगर अभी जिंदा है. त्यांच्याकडून रोज पु्ड्या सोडल्या जात आहेत.
टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडं जाणार होती. त्यांच्यातलाच एक माणूस आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी मध्यंतरी होती. त्याचं काय झालं. आता त्या बातमीवरून लक्ष वळवायचं असेल म्हणून आमच्यावर आले. आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसात मनं कलुषित करण्याचा जो प्रकार सध्या सुरू आहे त्याचा मी निषेध करतो, असे खासदार सावंत म्हणाले.
मोठी बातमी! अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी; नेमकं काय घडलं?
आताच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, अनिल देसाई, अरविंद सावंत, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे नऊ खासदार निवडून आले आहेत. तसेच दोन खासदार राज्यसभेत आहेत. आता या 11 खासदारांपैकी कोण ठाकरेंची साथ सोडून जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.