Download App

Dasara Melava : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रूपये मदत करा, शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली

शिवतीर्थावर शिवसेनेचा (उबाठा) मेळावा पार पडत आहे.

Shiv Sena Uddhav Thackeray Dasara Melava : शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे गट) यांचे दसरा मेळावे आयोजित केलेत. शिवतीर्थावर शिवसेनेचा (उबाठा) मेळावा पार पडत आहे. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोनं. काहींनी माणसं पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे. गाढवावर कितीही शाली टाका. गाढव ते गाढवच, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता केली.

कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली

आज सगळीकडे चिखल झालाय, याचं कारण कमळाबाई (BJP). कारण कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली, परंतु जनतेच्या जीवनाचा चिखल झालाय. घरादारासह चिखल झालाय, शेती वाहून गेली. अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली नव्हती, असं देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी म्हटलंय. सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो, हे संकट खूप मोठं आहे. आपल्याकडे सरकार नाही, परंतु जी काही करता येईल ती फुल न फुलाची पाकळी आपण मराठवाड्यासाठी करू.

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार

आजचे मुख्यमंत्री आहेत, खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा. सगळे निकष बाजूला ठेवा. ज्यांचं नुकसान झालंय, त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रूपये मदत करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भाजप म्हणजे अमिबा

भाजप म्हणजे आता अमिबा झाला आहे. वाटेल तसं वेडेवाकडं कसंही पसरतो. कोणाशी पण युती करतो, शरिरात घुसले की बिघवडते. मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहे. इंडिया टुडेने एक सर्व्हे केलाय. मोस्ट पॉप्युलर सीएम. आपल्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये होता. आजच्या सर्वेमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, ममता बॅनर्जी आहेत.

भाजपवाले हिंदु-मुसलमान करायला लागले

निवडणूक तुम्ही लावाच. जनता वाट बघतेय. जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई. मेट्रो अन् मोनो रेलपेक्षा बोटसेवा सुरू करा, असं देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. निवडणुका जवळ येत आहेत, तसे भाजपवाले हिंदु-मुसलमान करायला लागले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

तुम्ही मुंबई जिंकूच शकू नाही. जिंकली तर अदानीला समर्पित कराल. तुम्ही एक व्यापारी म्हणून मुंबईकडे पाहात आहात. तुम्ही आधी फडक्यावरचा हिरवा काढा, मग आमच्या अंगावर या, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

follow us