राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अन् संजय राठोड पोहोचले अमित शाहांच्या भेटीला

Sanjay Rathod wants to meet Amit Shah :  राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत. आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली. भाजपचे सहा व शिवसेनेचे चार मंत्री शपथ घेणार असे यावेळी बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याभेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे. […]

Letsupp Image (68)

Letsupp Image (68)

Sanjay Rathod wants to meet Amit Shah :  राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत. आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली. भाजपचे सहा व शिवसेनेचे चार मंत्री शपथ घेणार असे यावेळी बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याभेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे.

संजय राठोड हे अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे. त्यानुसार राठोड हे शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राठोड यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलायला नकार दिला आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहे, काही ठिकाणी लोकसभेच्या जागांवरुन भाजप व शिवसेनेत वाद होत आहेत. त्यात राठोड यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Pawar Vs Tumane : थेट अजितदादांवर पैसे खाण्याचा आरोप; खासदाराला दिलं तिखट प्रत्युत्तर

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता राठोड हे शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे.

Amit Shah : चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी भाजपची रणनिती; अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा

मंत्री संजय राठोड यांचे दोन दिवसांपूर्वीचे एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. राज्यात सत्तांतर झालं त्यावेळी मला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत रहायचं होतं. पण धर्मगुरु बाबूसिंग महाराज यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा सल्ला दिला होता. पोहरादेवीच्या विकासासाठी शिंदे गटात जाण्याचा सल्ला धर्मगुरुंनी दिला. त्यामुळे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आल्याचे त्यांनी म्हटले होते.

Exit mobile version