Amit Shah : चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी भाजपची रणनिती; अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा

Amit Shah : चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी भाजपची रणनिती; अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा

Amit Shah in Nanded : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये 30 मे ला केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्ष झाल्याच्या निमित्ताने सध्या 1 ते 30 जून दरम्यान देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहिर सभा होणार आहे. त्यामुळे भाजप अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यात यशस्वी होणार का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
( Amit Shah meeting in Nanded Ashok Chavan )

चर्चा झाली पण Amit Shah नागपूरला आलेच नाहीत, दौरा रद्द करण्यामागचं कारण काय ?

10 जून ला नांदेडमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सायंकाळी 5 वाजता अबचलनगर, बाफना येथे ही सभा पार पडणार आहे. दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शासकीय विश्रामगृहावर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्याचबरोबर केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्ष झाल्याच्या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या अभियानामध्ये जिल्हा, मंडळ शक्ती केंद्र आणि बूथ पातळीवर विविझ कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.

“Amit Shah यांच्या वेळेमुळेच दुपारी कार्यक्रम; व्हीआयपी छपराखाली आणि…” संजय राऊत यांचा हल्लाबोल

दिल्लीतील मोदी सरकारला नुकतीच नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली होती. त्यावर्षी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने प्रचंड बहुमत मिळवले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदीच्या त्सुनामीने विरोधी पक्षांची धुळधाण झाली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लोकसभेच्या 303 जागा जिंकल्या होत्या.

त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सर्व नेते, मंत्री सहभागी घेणार असून देशपातळीवर एका मंत्र्याला दोन लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री अमित शाहा यांचा 10 जून रोजी नांदेड दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यात यशस्वी होणार का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube