Download App

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची बॅनरबाजी; वर्धापनदिनाची जय्यत तयारी

Eknath Shinde Vs Udhdhav Thackeray :  शिवसेनेचा आज ( 19 जून ) रोजी  57वा वर्धापनदिवस आहे. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती. पण यावेळेस शिवसेना आणि ठाकरे गटाकडून  जोरदार तयारी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी वर्धापनदिनासाठी जय्यत तयारी केली. शिवसेनेचा आज पहिलाच असा वर्धापन दिन आहे, की जेव्हा दोन पक्ष हा दिन साजरा करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गट व शिवसेनेकडून मुंबईभर बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर पोस्टर लावले आहे.

एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. यानंतर निवडणूक आयोगाने निकाल देताना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाकडे गेले. त्यामुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिवस हा खास असणार आहे. आज या दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लग लागले आहे.

सुषमा अंधारेंमुळे मी पक्ष सोडला, पक्ष प्रवेशानंतर आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या…

आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. निष्ठावंतांचा कुटुंबसोहळा, शिवसेना परिवार जगावेगळा अशा आशयाची बॅनरबाजी होर्डिंग्जवर करण्यात आली आहे.

Ayodhya Poul News : कोण आहेत ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ?

दरम्यान, 2019 साली 56 आमदार निवडून आले होते. त्यापैकी 40 आमदार हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत आले आहे. तसेच लोकसभेच्या 18 खासदारांपैकी 13 खासदार हे शिंदेंसोबत आहे. त्यामुळे यावर्षी शिवसेनेच्या वर्धापनदिनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

 

 

Tags

follow us