Download App

…तर शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार; अजितदादांच्या भाजपसोबत जाण्यावर शिरसाटांचे मोठे विधान

 Sanjay Shirsat On Ajit Pawar : अजित पवार शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत आहे, असे मत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांना भाजपची कोणतीही ऑफर नाही. त्यामुळे अजित पवार खरंच भाजपसोबत येणार का ही चर्चा आणखी तीव्र झाली आहे.

अजितदादा नॉट रिचेबल होणं नवीन नाही. ज्याअर्थी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईला येत आहेत, त्यावरुन असे कळते की काही तरी होणार आहे. कोर्टातील केस व अजितदादा यांचा काही संबंध नाही. पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने अजितदादा नाराज झाल्यापासून अजितदादा नाराज झाले आहेत. अजितदादा आमच्याकडे आले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…मी काय अजित पवार यांचा प्रवक्ता नाही

अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे होऊन आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांना आमच्यासोबत यायचं असेल तर आमची विचारसरणी मान्य करावी लागेल. मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भाजपसोबत गेले तर शिंदे गट अर्थात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असंही शिरसाट यांनी सांगितले आहे.

नागपूरच्या वज्रमूठ सभेमध्ये अजित पवारांना बोलू दिले नाही. 14-15 आमदारांचा नेता असलेल्या उद्धव ठाकरेंना प्रमुख वक्ता म्हणून बोलू दिले जाते. पण 53 आमदारांचा नेता असलेल्या अजितदादांना बोलू दिले जात नाही. फक्त 10 मिनीटे अजितदादांना बोलू दिले असते तर काय बिघडले असते, असे शिरसाट म्हणाले आहेत.

Ajit Pawar : कुठलाही भूकंप सांगून येत नाही, बंडावर अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य

मात्र, या सर्व चर्चांवर काहीवेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ही केवळ तुमच्या (माध्यमांच्या) मनातील चर्चा आहेत. या सर्व बातम्या खोट्या आहेत. अजित पवारही पक्षाचं काम करतायत. राष्ट्रवादीमध्ये सर्व काहीआलबेल आहे. सगळे सहकारी पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत.” असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी आज दिलं आहे.

 

Tags

follow us