Womens Reservation Bill : लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण विधेयक (Womens Reservation Bill) काल (दि.19) लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले. यावर आज (दि.20) दीर्घ चर्चा केली जात आहे. सोनिया गांधी आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाच्या मुख्य स्पीकर आहेत. त्यांनीही काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनाप्रमु्ख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगत मोदी सरकारवर जोरदार टीका करत या विधेयकाचे स्वागतही केले.
राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेबांची आठवण सांगत महिला आरक्षणासंदर्भात त्यांचं काय मत होतं हे देखील सांगितले. राऊत म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महिला आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. महिलांना थेट जागा देण्यापेक्षा राजकीय पक्षांवर बंधने टाकून त्यांनाच 33 टक्के महिला निवडून आणण्याबाबत नियम करावा, असं बाळासाहेबांचं मत होतं.
महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसकडून समर्थन; लोकसभेत सोनिया गांधींकडून भूमिका स्पष्ट
महिला आरक्षण विधेयकावर बोलताना त्यांनी सरकारला काही प्रश्न केले. ते म्हणाले, चांगली गोष्ट आहे की 13-14 वर्षांपासून हे विधेयक वनवासात गेलं होतं. हाणामाऱ्या झाल्या, रणकंदन माजलं होतं. फक्त महिलांची संख्या वाढवून त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यावरील अत्याचार थांबणार आहेत का, कायदे केल्यानंतरही देशात निर्भयांचे बळी जातच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना आरक्षण असले तरी तिथे सगळ्याच पक्षात घराणेशाही दिसते हे नाकारता येणार नाही. त्यामुळे महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याऐवजी आपापल्या पक्षातूनच महिलांना आरक्षण दिलं पाहिजे, असं बाळासाहेबांचं मत होतं.
राऊत पुढे म्हणाले, ज्या नव्या संसद भवनातून मोदी सरकारने हे बिल आणले त्याच संसद भवनाच्या उद्घाटनापासून महिला राष्ट्रपतींना रोखण्यात आलं. आता पुढील निवडणुका होतील. 2029 मध्ये हे सरकार राहिल की नाही हे मला माहित नाही पण, तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल. पण तरीसुद्धा असा कायदा जर कुणी करत असेल तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
Maharashtra Politics : सुळेंचे भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आव्हान, तटकरेंनी थेट निकालच सांगितला
लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण विधेयक काल (दि.19) लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले. यावर आज (दि.20) दीर्घ चर्चा केली जात आहे. यावेळी काँग्रेसकडून या विधेयकाला समर्थन असल्याचे सोनिया गांधींकडून (Sonia Gandhi) स्पष्ट करण्यात आले आहे. त्या लोकसभेत बोलत आहेत. हे विधेयक दिवंगत पंतप्रधान आणि माझे पती राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांनी आणले होते. त्यामुळे हा क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय हृदयस्पर्शी क्षण असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. हे विधेयक मंजूर झाल्यावर राजीव गांधींचे अधुरे स्वप्न पूर्ण होईल असे भावनिक उद्गार सोनिया गांधीं यांनी यावेळी बोलून दाखवले.