महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसकडून समर्थन; लोकसभेत सोनिया गांधींकडून भूमिका स्पष्ट

  • Written By: Published:
महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसकडून समर्थन; लोकसभेत सोनिया गांधींकडून भूमिका स्पष्ट

नवी दिल्ली :  लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण विधेयक काल (दि.19) लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले. यावर आज (दि.20) दीर्घ चर्चा केली जात आहे. यावेळी काँग्रेसकडून या विधेयकाला समर्थन असल्याचे सोनिया गांधींकडून (Sonia gandhi) स्पष्ट करण्यात आले आहे. त्या लोकसभेत बोलत आहेत. हे विधेयक दिवंगत पंतप्रधान आणि माझे पती राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांनी आणले होते. त्यामुळे हा क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय हृदयस्पर्शी क्षण असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. हे विधेयक मंजूर झाल्यावर राजीव गांधींचे अधुरे स्वप्न पूर्ण होईल असे भावनिक उद्गार सोनिया गांधीं यांनी यावेळी बोलून दाखवले. (Sonia Gandhi On Women Reservation Bill)

जातीय जनगणना करून आरक्षण द्यावे : सोनिया

महिला आरक्षण विधेयकावर बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की,  भारतीय महिलांमध्ये हिमालयासारखा संयम असून, नव्या भारताच्या उभारणीत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. महिला कधीही संकटांच्या ओझ्याखाली दबली गेलेली नाही. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व हे त्याचे उदाहरण आहे. या विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही सोनिया गांधीकडून करण्यात आली. तसेच जातींची जनगणना करून एससी/एसटी/ओबीसी आरक्षण द्यावे असेही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.

Pimpri News : पंगा घेणाऱ्या थोरातांचा पत्ता कट तर, आमदार लांडगेंनाही जगतापांचा सूचक इशारा

पुढे बोलताना सोनिया म्हणाल्या की, भारतीय महिलांनी सर्वांच्या कल्याणासाठी काम केले असून, स्त्रीच्या सहनशीलतेचा अंदाज लावणे खूप कठीण काम आहे. हे विधेयक सरकारने आणले असले तरी कुठेतरी काँग्रेस त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा उल्लेख सोनियांनी त्यांच्या भाषणात केला. हे विधेयक आणण्यास विलंब झाल्यास महिलांवर अन्याय होईल. त्यामुळे हे विधेयक तातडीने लागू करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी यावेळी केली.

Women’s Reservation Bill : अर्ध्या लोकसंख्येला खुश करत भाजपचा मास्टरस्ट्रोक; 2024 मध्ये किती फायदा होणार ?

हे विधेयक माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आणले होते. त्यावेळी अवघ्या सात मतांनी हे विधेयक राज्यसभेत पराभूत झाल्याचेही यावेळी सोनिया यांनी सांगितले. हे विधेयक राजीव गांधींचे स्वप्न होते. नंतर पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने ते मंजूर केले. याचाच परिणाम म्हणून स्थानिक पातळीवर निवडून आलेल्या 15 लाख महिला नेत्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=mYYFRZ8ErQs

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube