Download App

‘उदयनिधींच्या वक्तव्याने देशातील 90 कोटी हिंदूंच्या’.. ठाकरे गटानेही फटकारलं !

Sanatan Dharma Row : सनातन धर्माबद्दल केलेल वक्तव्य (Sanatan Dharma Row) तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना चांगले भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता सामना मुखपत्रातून ठाकरे गटानेही या प्रकरणी भूमिका स्पष्ट केली आहे.

हिंदू धर्म (Sanatan Dharma) हा पृथ्वीतलावरील सगळ्यात जुना धर्म आहे. पाच हजार वर्षांआधी हा धर्म स्थापन झाला. अनेक संकटे, वादळ, घाव अंगावर झेलून या धर्मची पताका फडकत आहे. त्यासाठी महाभारत काळापासून अगणित लोकांनी बलिदाने दिली आहेत. तलवारीच्या आणि तागडीच्या जोरावर हा सनातन धर्म विकलांग करण्याचा प्रयत्न झाला पण, धर्मची पताका फडकत आहे. त्यामुळे तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी तोडलेले तारे अज्ञानाच्या अंधारात लुप्त झाले आहेत.

BJP : बंगालमध्ये भाजपला धक्का! नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांची पक्षाला सोडचिठ्ठी

उदयनिधींचे वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावणारे

उदयनिधी काय म्हणाले, सनातन धर्म (Sanatan Dharma) सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही, त्यांना संपवून टाकावे लागते. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. ते आपल्याला संपवायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सनातन धर्मालाही संपवायचे आहे. उदयनिधी यांचे हे विधान त्यांच्या द्रविडी भूमिकेशी तर्कसंगत असले तरी देशातील 80-90 कोटी हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे.

गर्व से कहो हम हिंदू है, हीच शिवसेनेची भूमिका

भाजप आणि त्यांच्या बजरंगी बगलबच्च्यांना तर उदयनिधींच्या वक्तव्याने उकळ्याच फुटल्या. उदयनिधींना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे. ते देण्याचे सोडून इंडिया आघाडी आता उदयनिधींवर काय भूमिका घेणार शिवसेनेच यावर धोरण काय वगैरे प्रश्न विचारले गेले. शिवसेनेची भूमिका जुनीजाणती म्हणजे गर्व से कहो हम हिंदू है हीच आहे व राहणार. ममता बॅनर्जींपासून केजरीवाल, काँग्रेस वगैरे लोकांनीही उदयनिधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे, असे या लेखात म्हटले आहे.

‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र

तामिळनाडूत पौर्णिमेऐवजी अमावस्येला मंगलकार्ये

हिंदू धर्माने दोष दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. सतीची चाल, अस्पृश्यता, विषमता, स्त्री शिक्षण अशा अनेक विषयांवर हिंदू धर्माने प्रगतीशील भूमिका घेतली. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा इतिहास समजून घेतला पाहिजे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. द्रविड विरुद्ध सनातन हा संघर्षाचा इतिहासही जुनाच आहे. त्याच संघर्षातून दक्षिणी लोकांचा हिंदी विरोध वाढला. ते हिंदू धर्म, त्यांचे देव, परंपरा मानायला तयार नाहीत. द्राविडी पक्षांचा पायाच ब्राह्मणवादाच्या विरोधाचे प्रतीक म्हणून घालण्यात आला. तामिळनाडूत सनातन विरोध इतका टोकाचा आहे की तेथे पौर्णिमेऐवजी अमावस्येला मंगल कार्ये, उद्घाटने, शुभारंभ केले जातात. अशा द्रविडी स्थानातून सनातन धर्मास विरोध होणे ही बाब आश्चर्यकारक नाही, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

Tags

follow us