शिवसेनेत पडलेली ऐतिहासिक फूट व या फुटीनंतर शिंदे गटाला मिळालेले पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यामुळे खचलेल्या राज्यातील शिवसैनिकांना उभारी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आजपासून राज्यभरात शिवगर्जना अभियान राबवण्यात येणार आहे. पुढे ते ३ मार्च पर्यंत चालणार आहे.
हेही वाचा : Interview : Aaditya Thackeray चहा घेतात ? त्यांनीच सांगितला किस्सा…
रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांकरिता शिवसेना नेते श्री.सुभाष देसाई, उपनेत्या श्रीम.मीना कांबळी, श्रीम.विशाखा राऊत, मा.आमदार श्री.तुकाराम काते, महिला आघाडी श्रीम. तृष्णा विजवासराव, युवासेना कु.राजोल पाटील
ठाणे, पालघर या जिल्ह्यांकरिता खा. श्री.राजन विचारे, मा.आमदार श्री.योगेश घोलप, श्री.राजाभाऊ वाजे, विभागसंघटक श्रीम.राजुल पटेल, युवासेना सौ.शितल देवरुखकर-शेठ
संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांकरिता मा.आमदार श्री.अनिल कदम, डॉ.जयप्रकाश मुंदडा, उपनेत्या श्रीम.किशोरी पेडणेकर, युवासेना श्री.अंकित प्रभू
नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांकरिता खा. श्री.संजय (बंडू) जाधव, उपनेते श्री.नितीन बानुगडे पाटील, उपनेत्या श्रीम.ज्योती ठाकरे, मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर, युवासेना श्री.प्रविण पाटकर
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांकरिता शिवसेना नेते श्री.अनंत गीते, उपनेत्या श्रीम.संजना घाडी, मा.आमदार श्री.विजय औटी, युवासेना सचिव श्री.वरुण सरदेसाई
नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांकरिता ठिवसेना नेते खा. श्री.अरविंद सावंत, उपनेते श्री.लक्ष्मण वडले, श्री.अमोल कीर्तिकर, मा.आमदार श्री.शिवाजी चोथे, युवासेना श्री.पवन जाधव
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांकरिता शिवसेना नेते श्री.चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख श्री.प्रकाश मारावार, युवासेना श्री.हर्षल काकडे, श्री.शरद कोळी, सौ.दुर्गा शिंदे
बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांकरिता खा.श्री.ओमराजे निंबाळकर, उपनेत्या श्रीम.सुषमा अंधारे, महिला आघाडी श्रीम.शुभांगी पाटील, मा.आमदार श्री.रामकृष्ण मडावी, प्रवक्ते श्री.अनिष गाढवे
नगर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांकरिता उपनेते श्री.विनोद घोसाळकर, श्री.विजय कदम, मा.आमदार श्री.सुभाष वानखेडे श्री.उल्हास पाटील, युवासेना श्री.साईनाथ दुर्गे, कु.सुप्रदा फातर्पकर
कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांकरिता शिवसेना नेते खा. श्री.संजय राऊत, उपनेत्या खा. श्रीम.प्रियंका चतुर्वेदी, प्रवक्ते श्री.लक्ष्मण हाके, मा.आमदार श्री.बाबुराव माने, युवासेना श्री.विक्रांत जाधव
या अभियानाची जबाबदारी पक्षाच्या खासदार, आमदार प पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोपांना व टीकेला उत्तर दिले जाणार आहे. या अभियानात शिंदे गटातील ४० आमदारांच्या मतदारसंघांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पर्यायी उमेदवारांचा शोधही घेतला जाईल.