Shivswarajya Yatra : संपूर्ण राज्यात शिवस्वराज यात्रेला (Shivswarajya Yatra) भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचा उद्देश वेगवेगळ्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, या यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.
यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी 27 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता पांडुरंग लॉन्स राहुरी येथे येणार आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे ,खासदार नीलेश लंके,कार्याध्यक्ष संदीप वर्पे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
अधिक माहिती देताना आमदार तनपुरे म्हणाले की संपूर्ण राज्यात शिवस्वराज यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचा उद्देश वेगवेगळ्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, या यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत. तरुण पिढीचे प्रबोधन करणे, युवाशक्तीला देशाच्या विकास प्रक्रियेत प्रभावीपणे सहभागी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा यात्रेचा प्रमुख भाग आहे.
पक्षाने नेहमीच तरूणांच्या समस्या, शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते युवा वर्गाशी संवाद साधणार असल्याने शहराच्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करत यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.
YouTuber Elvish Yadav : ईडीची मोठी कारवाई, यूट्यूबर एल्विश यादवची मालमत्ता जप्त
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, तालुका महिला अध्यक्ष शारदा खुळे, युवकचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर, शहराध्यक्ष संतोष आघाव, महिला शहराध्यक्ष अपर्णा ढमाळ यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.