Download App

ससून रुग्णालयात धक्कादायक प्रकार, बेवारस रुग्णांचे हाल, रिक्षावाल्याला पाचशे रुपये अन् …

Sassoon Hospital : गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा पुणे (Pune) जिल्ह्यातील ससून रुग्णालय (Sassoon Hospital

  • Written By: Last Updated:

Sassoon Hospital : गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा पुणे (Pune) जिल्ह्यातील ससून रुग्णालय (Sassoon Hospital) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या रुग्णालयात एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड (Ritesh Gaikwad) व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड (Dadasaheb Gaikwad) यांनी ससूनवर गंभीर आरोप केले आहे. रात्रीच्या वेळी ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना निर्जनस्थळी सोडून येतात. असा गंभीर आरोप वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी केला आहे. या आरोपावरून येरवडा पोलिस ठाण्यात ससूनमधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दादासाहेब गायकवाड बेवारस रुग्णांची सेवा करतात. ससून रुग्णालयात रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते दाखल करतात. त्यांनी दीड वर्षापूर्वी एका बेवार रुग्णाला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते आणि दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेले असता तो रुग्ण गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्या रुग्णाला डॉक्टर रात्री घेऊन गेले होते तसेच बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार रुग्णालयात सुरु आहे. अशी माहिती त्यांना मिळाली.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी रितेश गायकवाड यांच्यासोबत ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. सोमवारी रात्री दीड वाजता रितेश गायकवाड रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर थांबले असता रुग्णलयातील काही डॉक्टरांनी एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली.

कुठे सोडायचे अशी विचारल्यावर ‘इथून लांब नेऊन सोड,पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे, अशा ठिकाणी सोडायला सांगितले’. ‘नेमके कुठे सोडू ? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत’ असे विचातल्यावर डॉक्टरांनी तू नवीन आहेस?, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर काही वेळाने डॉक्टरांनी रुग्णलयातील नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रिक्षात आणला आणि त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले.

त्यानंतर पोलिसांना रितेश गायकवाड यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने पुन्हा त्या रुग्णाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तसेच याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांची पिळवणूक अन् गुंडांची पाठराखण…पोलीस प्रशासनावर कळमकरांचा संताप

बेवारस रुग्णांना ससून रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाही. स्वतः डॉक्टर त्यांना बाहेर मरणासाठी सोडून देत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी रितेश गायकवाड यांनी केली आहे.

follow us