Shrigonda Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून नगरपंचायत आणि नगरपालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच दररोज काहींना काही नवीन नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यातच अर्ज छाननी प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या एका परिपत्रामुळे मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळला.
अहिल्यानगरमधील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात माजी मंत्री पाचपुते यांच्या सुनेचा अर्ज अपक्ष ठरल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्य निवडणुक आयोगाने काढलेल्या परिपत्रानुसार आता बी फॉर्म अर्थात डमी उमेदवारांच्या अर्जावर सूचकांची संख्या 5 असणे आवश्यक आहे. जर डमी उमेदवारांच्या अर्जावर सूचकांची संख्या 5 नसल्याचा अर्ज बाद होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा फटका पाचपुते यांच्या सुनेला देखील बसला.
श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक यंदा चौरंगी होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून इंद्रायणी पाचपुते (Indrayani Pachpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकाडून ज्योती खेडकर आणि शिवसेना शिंदे गटाकडून शुभांगी पोटे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी आहे. मात्र इंद्रायणी पाचपुते यांचा अर्ज अपक्ष ठरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी ‘ए’ ‘बी’ फॉर्म देण्यात येतो.
निवडणूक आयोगाच्या आधीच्या नियमानुसार ए व बी फॉर्मसोबत एक सूचक असल्याच अर्ज वैध ठरत होता मात्र आता नव्या नियमांनुसार सूचकांची संख्या 5 असणे आवश्यक आहे. नव्या नियमांनुसार आता नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या डमी उमेदवाराच्या अर्जात एकत सूचक असल्यास छाननी अंती अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात यावा आणि त्या उमेदवाराने पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह नामानिर्देशन अर्ज सादर केला असल्यास व कागदपत्रांची तसेच अटी शर्तीची पूर्तता केली असल्यास त्याचा अर्ज अपक्ष म्हणून पात्र ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे माजी आमदार बबनराव पाचपुतेंच्या सुनेचा अर्ज अपक्ष ठरवण्यात आला आहे.
आशीष चंचलानी हॉरर-कॉमेडी ‘एकाकी’चा पहिला गाणं ‘रम रम रम’ रिलीज
