VIDEO: पवार गटाच्या नेत्याची ‘दादागिरी’; थेट अभियंत्याला शिविगाळ करत बूट काढला
Balasaheb Nahata : तसेच अधिकाऱ्याला शिविगाळ केलीय. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील महावितरण कार्यालयात गुरुवारी हा प्रकार घडला आहे.

Balasaheb Nahata : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा (Balasaheb Nahata) यांनी महावितरणाच्या अभियंत्याला बूट काढत दादागिरी केलीय. तसेच अधिकाऱ्याला शिविगाळ केलीय. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील महावितरण कार्यालयात गुरुवारी हा प्रकार घडला आहे.
बाळासाहेब नाहाटा यांच्या लोणी गावामध्ये विजेचा प्रश्न आहे. गावात वीज नसल्याने शिष्टमंडळाबरोबर ते बेलवंडी येथील महावितरण कार्यालयात आले होते. गावातील वायरमन हा काम करत नसल्याचे त्यांची तक्रार होती. त्याचवेळी कार्यालयातील तायडे नावाच्या अधिकाऱ्याबरोबर नाहाटा यांचा वाद झाला. तेव्हा तायडे यांनी मला अरे तूरे बोलू नका अशी विचारणा केली. तेव्हा नाहाटा यांनी मी तायडे म्हणालो, अरे तू रे बोललो नाही. त्यानंतर नाहाटा हे चिडले.
खुर्चीवरून त्यांनी तुला बुटाने मारेल. हरामखोर असे शब्द अभियंत्याला वापरले. त्यावेळी नाहाटा हे खुर्चीवर उठले आणि हातात बूट घेऊन तायडे या अधिकाऱ्याकडे फेकत होते. त्याचवेळी शिष्टमंडळात आलेल्या काही जणांनी नाहाटा यांना पकडले आणि त्यांना शांत केले. (AjiT Pawar group leader Balasaheb Nahata act; He directly insulted the engineer and threw his shoe)
महसूल सेवकांना न्याय मिळणार, तलाठी भरतीत प्राधान्य देणार! महसूलमंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा (Balasaheb Nahata) यांनी महावितरणाच्या अभियंत्याला बूट काढत दादागिरी केलीय. pic.twitter.com/YIrFBz8Awv
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 16, 2025
व्हिडिओ व्हायरल
शिष्टमंडळ हे अधिकाऱ्याशी चर्चा करत होते. त्यावेळी एक जण मोबाइलवर शूटिंग करत होता. सर्व संवाद रेकॉर्ड झाला. त्याचवेळी नाहाटा यांचा बूट काढण्याचा आणि गोंधळ घालण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार! तिसऱ्यांदा, लॉरेन्स टोळीने सोशल मीडियावर…
नाहाटा यांची कर्मचाऱ्यालाही धमकी
हा प्रकार घडल्यानंतर नाहाटा यांनी लोणी येथील वीजकर्मचारी अनिल पवार याला फोन केला. गावात काही झालं, त्याचा गुन्हा दाखल करू नको. मी आणि तायडे बघून घेऊ, तू मधी पडू नको, अशी फोन करून धमकी दिली.