कल्याण : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत. एक दिवसीय दौरा आहे. ठाकुर यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत बोलताना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र सावध पवित्रा घेत भाजपने ज्या १८ जागा निवडल्या आहेत. त्या जागा पूर्ण बळकट करण्याचं प्रयत्न आहे. भाजप आणि शिंदेंच्या सेनेमध्ये अतिशय अंडरस्टँडिंग आहे. मुळात लोकसभेच्या जागा आहेत त्या भाजपच्या दृष्टीने सक्षम केल्याच पाहिजे. शेवटी केंद्र आणि राज्यातले पक्ष श्रेष्ठी निर्णय घेत असतात. सक्षमपणे आपण लढलो पाहिजे जिंकलो पाहिजे कोण उभे राहणार, कोणाला सीट जाणार हा निर्णय नेतृत्व करेल, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जे मतदारसंघ याआधी भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत असे महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. यात कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. प्रामुख्याने डोंबिवली शहरात भाजपच्या मतदारांची संख्या अधिक आहे. येत्या १४ तारखेला भाजपच्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेचा एक दिवस दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत, अशी माहिती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी संजय केळकर यांनी दिली.
दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये देखील अनुराग ठाकुर यांनी तीन दिवसांचा दौरा केला होता. कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला मानला जातो. सलग दोन वेळा या मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या शिंदे यांचे या मतदार संघावर वर्चस्व आहे. छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी रात्री-अपरात्री मतदार संघात फिरून डॉ. शिंदे यांनी कार्यकर्त्याशी जिव्हाळ्याचे संबध निर्माण केले आहेत. भाजपाचा पाठिंबा मिळवत एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. असे असतानाच डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात भाजपने लक्ष केंद्रित करत शत प्रतिषत नारा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
याबाबत संजय केळकर यांनी लोकसभेच्या जागा आहेत त्या भाजपच्या दृष्टीने सक्षम केल्याच पाहिजे. शेवटी केंद्र आणि राज्यातले पक्ष श्रेष्ठी निर्णय घेत असतात. सक्षमपणे आपण लढलो पाहिजे जिंकलो पाहिजे कोण उभ राहणार कुणालाकोणाला सीट जाणार हा निर्णय नेतृत्व करेल, असे सांगत बाजू सावरली. तर लोकसभा मतदार संघासाठी संजय केळकर यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबाबत केळकर यांनी चर्चा तर कायम होत असते. इच्छुकांचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न नसून पक्ष काम देईल ते काम करणे हेच आमचे काम असल्याचे सांगितले.