Srinivas Pawar On Rohit Pawar : जय पवारांची चूक नाही, तो दादांचा मुलगा; 2029 विधानसभा निवडणुकीवर नेमकं काय म्हणाले श्रीनिवास पवार ?

Srinivas Pawar On Rohit Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीत

Srinivas Pawar On Rohit Pawar

Srinivas Pawar On Rohit Pawar

Srinivas Pawar On Rohit Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याचे संकेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जय पवार यांनी दिले आहे. रोहित पवार आणि जय पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) म्हणाले की, मी खरंतर दोघांचंही वक्तव्य ऐकलेलं नाही. दोघेही तरुण आहेत. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मत आहेत. रोहितचं मत आहे, जयचं मत आहे. त्याची इच्छा आहे. दादा म्हणायचे की, जय नको याच्यामध्ये पडू हे चांगलं नाही, लोकांचं बघून बघून त्याची इच्छा तयार झाली असेल. शेवटी त्याची काही चूक नाही. तो दादांचा मुलगा आहे. बहुतेक 2029 ला वहिनी माघार घेतील आणि जय येईल असं दिसतंय असं माध्यमांशी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले.

2029 मध्ये कोणत्या पक्षाची काय परिस्थिती असेल

पुढे माध्यमांशी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की, 2029 मध्ये कोणत्या पक्षाची काय परिस्थिती असेल आणि एकत्र कोण लढणार? कोण कोणाच्या विरोधात लढणार? युती होणार, नाही होणार विलीनीकरण होणार, नाही होणार, तीन वर्ष हा खूप मोठा काळ आहे. आता त्याच्यावर भाष्य करणं मलाही योग्य वाटत नाही.

शरद पवार निर्णय घेणार रोहित

किंवा युगेंद्र पवार जय पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? यावर बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की, तेव्हा पवार साहेब जे काही सांगतील त्यांचा पक्ष जो काही निर्णय घेईल, त्यांचा पक्ष जो सांगेल कारण युगेंद्र शरद पवार गटात आहे आणि जय पवार अजित पवार गटात आहे.

तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन; आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात, प्रकाशकाला दिली धमकी –

दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यांची विलीनीकरण होण्याची प्रक्रिया सुरु होती जे काय हे होतं ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ते सगळं थांबलेलं दिसत आहे. आता दोघांचे वेगवेगळी काम सुरु आहेत आता तसं काही होणार नाही असं नाही, 2029  ला काय होईल ते पाहता येईल असं माध्यमांशी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले.

Exit mobile version