तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन; आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात, प्रकाशकाला दिली धमकी
Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आले आहे. 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे
Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आले आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन त्यांनी या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर फोनवरील आमदार संजय गायकवाड यांचे शिवराळ संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
अरे गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहिती आहे ना, त्या गोविंद पानसरेचं काय झालं? त्याची अवस्था काय झाली होती? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन अशी धमकी आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांनी फोनवर दिली आहे.
तर दुसरीकडे शिवाजी कोण होता हे पुस्तक मी नव्हे तर प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी लिहिले आहे. हे पुस्तक 1988`मध्ये प्रकाशित झाले होते आणि या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तुम्ही आधी पुस्तक वाचा असं व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये प्रशांत आंबी आमदार संजय गायकवाड यांना सांगत आहे. यानंतर देखील आमदार संजय गायकवाड प्रशांत आंबी यांनी जीवे मारण्याची धमकी देत असल्याने तुम्ही उद्य माझी जीभ कापायला या असं प्रत्युत्तर देतात.
बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासातील कँटीन मधे हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो.
राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील… pic.twitter.com/rxRjBX2coa
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) April 23, 2026
प. बंगाल ममता अन् तामिळनाडूत स्टॅलिन भाजपचा थेट सामना! आज मतदान कोण मारणार बाजी?
या प्रकरणात ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काही कारवाई होणार का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.