Download App

video : ‘राऊत अन् नड्डांची दिल्लीत तर फडणवीस अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट’, काय आहे प्रकरण?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे. हा दावा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meet : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक दावे प्रतिदावे होणार आहेत. दरम्यान, राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्री येते गुप्त भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

स्वतः गाडी चालवत  गेले

वंचित बहुजन आघाडीला शिवसेना ठाकरे व भाजपमधील राजकीय घटनाक्रमाविषयी एक विश्वासार्ह बातमी मिळाली आहे. त्यानुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर काही दिवसांतच 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस स्वतः गाडी चालवत एकटे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. त्यांच्यामध्ये जवळपास 2 तास बैठक झाली असाही दावा मोकळे यांनी केला आहे.

Video: सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात, दिल्लीत काय घडलं?

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट् रोजी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले. दिल्लीला जाताना त्यांच्यासोबत कोण-कोण होते? दिल्लीत त्यांनी कुणाच्या भेटीगाठी घेतल्या? असे प्रश्न उपस्थित करत या भेटीतील सगळं उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगावं अस आव्हानही मोकळे यांनी दिलं आहे.

मतदारांची फसवणूक

वंचित बहुजन आघाडीला या घटनाक्रमाविषयी जी माहिती मिळाली आहे, ती आम्ही जनतेपुढे ठेवत आहोत. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांना भाजप व त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी असल्याचे पक्के माहिती आहे. याच आरक्षणवादी मतदारांनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गत 5 वर्षांतील राजकीय घडामोडी पाहता यासंबंधी काही उलटसुलट राजकीय घडामोडी घडल्या तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही ही माहिती सार्वजनिक पटलावर ठेवत आहोत, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

follow us