दरमहा 15% परताव्याचे आमिष आणि कोट्यवधींचा घोटाळा; सिस्पे इन्फिनिटी प्रकरणात 12 आरोपी तुरुंगात

Sispe Infinity Case : जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि अहिल्यानगर तालुक्यात गाजलेल्या सिस्पे इन्फिनिटी कंपनीच्या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्यात

Sispe Infinity Case

Sispe Infinity Case

Sispe Infinity Case : जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि अहिल्यानगर तालुक्यात गाजलेल्या सिस्पे इन्फिनिटी कंपनीच्या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत तब्बल 278 कोटी रुपयांची रक्कम आणि मालमत्ता गोठवली आहे. या कारवाईमुळे हजारो फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. दरमहा 10 ते 15 टक्के परताव्याचे आमिष दाखवत कंपनीने पारनेर, श्रीगोंदा आणि नगर शहरासह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळले. सुरुवातीच्या दोन-तीन महिन्यांत परतावा देत विश्वास जिंकला; मात्र त्यानंतर अचानक कंपनी बंद करून एजंट फरार झाल्याने मोठा घोटाळा उघडकीस आला. गुंतवणूकदारांची सुमारे 400 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नव्या कारवाईत पोलिसांनी 9 कोटी रुपये रोख आणि तब्बल 156 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता गोठवली

या प्रकरणी 2024 मध्ये सुपा, श्रीगोंदा आणि नगर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले होते. तपासादरम्यान यापूर्वी पोलिसांनी 113 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यात 111 कोटी रुपये रोख आणि सुमारे अडीच कोटींची स्थावर मालमत्ता होती. आता नव्या कारवाईत पोलिसांनी 9 कोटी रुपये रोख आणि तब्बल 156 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता गोठवली आहे. त्यामुळे जप्तीचा एकूण आकडा 278 कोटींवर पोहोचला आहे. आणखी काही मालमत्तांच्या जप्तीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. या घोटाळ्यात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात चार संचालकांचाही समावेश आहे. परदेशात फरार असलेल्या मुख्य संचालकांना लवकरच अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिला होता कारवाईचा इशारा 

सिस्पेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेतून घोटाळेबाजांना थेट आणि कठोर इशारा दिला होता. घोटाळेबाजांना कोणतेही अभय मिळणार नाही. त्यांनी लुबाडलेला पै न पै वसूल केला जाईल आणि दोषींना थेट तुरुंगात धाडले जाईल,अशी घोषणा करत त्यांनी मंचावरूनच कारवाईचा इशारा दिला होता. या वक्तव्यामुळे सभास्थळी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला आणि घोटाळ्याविरोधात सरकारची भूमिका अधिक आक्रमक असल्याचा संदेश गेला.

शिवनेरीवर खरचं चेंगराचेंगरी झाली का? SP संदीप गिल यांनी सांगितला घटनाक्रम

प्रकरणाची CBI चौकशी लावण्याची जोरदार मागणी

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील विविध कथित हजारो कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारांचा पाढा वाचत सिस्पे घोटाळ्याची CBI चौकशी लावण्याची जोरदार मागणी केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी थेट चर्चा करून या प्रकरणाची CBI चौकशी निश्चित करण्याचा शब्द दिला. या घोटाळ्याचा छडा लावण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,असे सांगत त्यांनी गुंतवणूकदारांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

Exit mobile version