जरांगेंच्या कथित ऑडिओप्रकरणी SIT स्थापन होणार ; CM फडणवीसांचे मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश

Manoj Jarange Audio Clip  : संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडवणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटी

Manoj Jarange Audio Clip

Manoj Jarange Audio Clip

Manoj Jarange Audio Clip  : संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडवणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्याकडून ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

ऑडिओ क्लिपवरुन (Audio Clip) भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) आरोप – प्रत्यारोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी देखील ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर (Social Media) ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर बोलताना अनेक गंभीर आरोप केले होते तसेच या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवेदन देण्यात आले होते तर दुसरीकडे या प्रकरणता सखोल चौकशी करण्यात यावी हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारर्कीर्द संपवण्याचा डाव होता. या प्रकरणात एआयला पुढे करुन भाजपला पळवाट करता येणार नाही. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवण्यात आले होते का? ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या लोकांच्या मागे देशातील कोणी बडा नेता आहे का याचा शोध एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे आम्ही त्यांना मदत करु असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले.

ऑडिओ क्लिप प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा हात? मनोज जरांगेंचं वक्तव्य 

तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑडिओ क्लिपबाबत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे. एसआयटी स्थापन झाल्यानंतर आता या प्रकरणात कोणता मोठा खुलासा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version